मळमळ, पोटदुखी, काविळ होईल बरा; आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितला द्राक्ष्याचा खास उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 02:14 PM2024-05-31T14:14:25+5:302024-05-31T14:15:04+5:30
द्राक्ष्याचं हे खास पाणी कसं तयार करायचं आणि त्याने कोणकोणत्या समस्या दूर होतात याची माहिती त्यांनी एका इन्स्टा व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे.
द्राक्ष ही सगळ्यांनाच आवडतात. खायल गोड-आबंट लागणारी द्राक्ष लोक आवडीने खातात. द्राक्ष्याचे शरीरालाही अनेक फायदे मिळतात. जे बऱ्याच लोकांना माहीत नसतात. आज आम्ही तुम्हाला द्राक्ष्याचा आरोग्याला कसा आणि काय काय फायदा होतो हे सांगणार आहोत.
द्राक्ष्याचं एका खास पद्धतीने जर सेवन कराल तर तुमच्या वेगवेगळ्या समस्या लगेच दूर होतील. आयुर्वेद डॉक्टर विलास शिंदे यांनी द्राक्ष्याचा एक खास आयुर्वेदिक उपाय सांगितला आहे. द्राक्ष्याचं हे खास पाणी कसं तयार करायचं आणि त्याने कोणकोणत्या समस्या दूर होतात याची माहिती त्यांनी एका इन्स्टा व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे.
कसं कराल तयार?
डॉक्टर शिंदे म्हणाले की, "द्राक्ष्याचा हा सार तुम्ही जेवण करताना सेवन करू शकता. ५० ग्रॅम द्राक्ष दोन कप पाण्यात टाकून चांगली कुस्करायची. त्यानंतर गाळून घ्यायची. त्यात दोन चिमुट जिरे पूड, दोन चिमुट काळं मीठ टाकायचं आणि जेवण करताना सेवन करायचं".
काय होतील फायदे?
डॉक्टरांनी सांगितलं की, "द्राक्ष्याच्या या साराने दारूची नशा झटक्यात उतरते, मळमळ, जळजळ वाटणं दूर होतं. तसेच तोडांला जर चव वाटत नसेल, आबंट ढेकर, पोट साफ होत नसेल तर याने या समस्याही दूर होईल. त्यासोबतच काविळ झाली असेल तर काविळ दूर करण्यासही हा सार फायदेशीर ठरतो".
द्राक्ष खाण्याची इतर फायदे
इम्यून सिस्टीम बूस्ट होते
द्राक्ष्यातील व्हिटॅमिन सी आणि अॅंटी-ऑक्सिडेंटमुळे इम्यून सिस्टीम मजबूत करण्यास मदत मिळते. ज्यामुळे तुम्हाला अनेक आजारांपासून बचाव करण्यास मदत मिळते.
हाडे होतात मजबूत
द्राक्ष्यामध्ये प्रोएंथोस्यानिडींस नावाचं तत्व असतं. यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. द्राक्ष्याचा सेवनामुळे हाडांसंबंधी समस्या ऑस्टियोअर्थरायटिसमध्येही आराम मिळतो.
हृदयासाठी फायदेशीर
द्राक्ष्यात असलेले अॅंटी-ऑक्सिडेंट आणि पॉलीफेनोल्स आपल्या हृदयाचं आरोग्य सांभाळण्यास मदत करतात. ज्यामुळे हृदयासंबंधी अनेक समस्यांचा धोका कमी होतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार यातील हायपोलिपिडेमिक गुण कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करतात.