कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचं कसं करावं सेवन? आयुर्वेद डॉक्टर म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 02:58 PM2024-11-12T14:58:53+5:302024-11-12T14:59:30+5:30
Tulsi Benfits : तुळशीच्या पानांचे फायदे मिळवण्यासाठी त्यांचं सेवन कसं करावं याबाबत आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Tulsi Benfits : तुळशीला हिंदू धर्मात फार महत्व आहे. तुळशीचा रोज वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापर तर केला जातोच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. आयुर्वेदात तुळशीला फार महत्व आहे. कारण याने समस्या दूर करण्यास मदत मिळते. तसेच धार्मिक महत्व तर आहेच. कुणी तुळशीची पाने अशी खातात तर कुणी चहात टाकतात. सर्दी, खोकला, कफ अशा सामान्य समस्या तुळशीच्या मदतीने दूर करता येतात. अशात तुळशीच्या पानांचे फायदे मिळवण्यासाठी त्यांचं सेवन कसं करावं याबाबत आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
तणाव कमी होतो
तुळस एक एडाप्टोजेन आणि स्ट्रेस कमी करणारी वनस्पती आहे. याने मन शांत करण्यास मदत मिळते. आधुनिक युगात याने रेडिओथेरपीचा प्रभाव कमी करण्यास मदत मिळते.
कोलेस्ट्रॉल कमी करते
तुळस एक फार उत्तम अॅंटी-वायरल आणि अॅंटी-कोलेस्ट्रॉल जडी-बूटी आहे. ज्याच्या मदतीने इम्यून सिस्टीम मजबूत होतं आणि हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. तुळशीचा रोजच्या आहारात समावेश केला तर कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासही मदत मिळते.
कसा कराल याचा वापर?
आयुर्वेद डॉक्टरांनुसार, तुळशीच्या चहाचं तुम्ही सेवन करू शकता किंवा तुमच्या हर्बल चहामध्ये रोज ४ ते ५ तुळशीची पाने टाकावी.
तुळशीचा चहा
५ तुळशीची पाने घ्या, त्यात थोडं आलं बारीक करून घ्या आणि २५० मिलीलिटर पाण्यात ३ ते ५ मिनिटे उकडा. नंतर गाळून याचं सेवन करा. तुम्हाला हवं तर या चहात मधही टाकू शकता. मात्र, मध चहा थंड झाल्यावरच टाकाल.
तुळशीची पाने चावून खावीत?
चहा पिणं तुळशीची पाने चावून खाण्यापेक्षा कधीही चांगलं मानलं जातं. कारण तुळशीच्या पानांमध्ये पारा असतो. जो दातांसाठी चांगला नसतो. जेव्हा पाने चावून खाल्ली जातात तेव्हा तोंडात पारा निघतो आणि दातांचं नुकसान होतं व रंग हलका होतो.