आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला - ३५ वयात आवर्जून खा 'या' ३ गोष्टी, कधीच औषधं घेण्याची येणार नाही वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 03:12 PM2024-11-07T15:12:26+5:302024-11-07T15:17:27+5:30

Healthy Food : या वयात डाएट आणि एक्सरसाईजसाठी वेळ मिळणं जरा अवघडच असतं. त्यामुळे शरीरात कमजोरी येऊ लागते आणि कमी वयातच म्हातारपणाची लक्षणं दिसू लागतात.

Ayurveda doctor's claim these 3 foods you should eat after 35 years age for healthy long life | आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला - ३५ वयात आवर्जून खा 'या' ३ गोष्टी, कधीच औषधं घेण्याची येणार नाही वेळ!

आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला - ३५ वयात आवर्जून खा 'या' ३ गोष्टी, कधीच औषधं घेण्याची येणार नाही वेळ!

Healthy Food : जसजसं वय वाढतं शरीरात वेगवेगळे बदल होऊ लागतात. खासकरून ३० वयानंतर शरीरात अनेक बदल होतात. ज्यांचा थेट आरोग्यावर प्रभाव पडतो. या वयात व्यक्ती नोकरी, कामधंदा किंवा परिवारात बिझी होऊन जातो. अशात त्यांना स्वत:साठी वेळ काढणं जरा अवघड होत असतं.

या वयात डाएट आणि एक्सरसाईजसाठी वेळ मिळणं जरा अवघडच असतं. त्यामुळे शरीरात कमजोरी येऊ लागते आणि कमी वयातच म्हातारपणाची लक्षणं दिसू लागतात. मेटाबॉलिज्म स्लो होतं, ज्यामुळे वजन वाढतं. मांसपेशी कमजोर होतात आणि शरीरात चरबी वाढू लागते. हाडंही कमजोर होऊ लागतात.

महिलांमध्ये मासिक पाळीसंबंधी बदल आणि पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची लेव्हलही कमी होऊ लागते. झोप न येण्याची समस्या, तणाव आणि चिंता वाढू शकते. अशात ३० वयानंतर आरोग्याची काळजी घेणं अधिक महत्वाचं ठरतं. त्यामुळे आयुर्वेद डॉक्टर रोबिन शर्मा यांनी ३० ते ३५ वयानंतरच्या व्यक्तींना आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काय करावं, काय खावं याबाबत माहिती दिली आहे. 

लसूण आणि आलं

बऱ्याच लोकांना आलं आणि लसणाची टेस्ट आवडत नाही. मात्र, या दोन्हींचं सेवन करणं खूप गरजेचं आहे. या दोन्ही गोष्टी हृदय, मेंदू, फर्टिलिटी पॉवर, लिव्हर आणि किडनीच्या आरोग्यासाठी महत्वाच्या आहेत. एक ते दोन लसणाच्या कळ्या आणि आल्याचा छोटा तुकडा चावून खा व वरून कोमट पाणी प्यावे.

मेथीचे दाणे

मेथीचे दाणे हे ८० प्रकारचा वात दूर करण्यास मदत करतात. वाढत्या वयात होणाऱ्या जास्तीत जास्त समस्याही मेथीच्या दाण्यांच्या मदतीने दूर करता येतात. यासाठी एक छोटा चमचा मेथीचे दाणे एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हे दाणे चावून खा आणि पाणी कोमट करून सेवन करा.

रोज एक्सरसाईज

डॉक्टरांनी सांगितलं की, कोणताही उपाय तेव्हाच प्रभावी ठरतो, जेव्हा शरीर तो पेलण्यासाठी तयार असतं. अशात शरीराची शक्ती वाढवण्यासाठी रोज काही एक्सरसाईज करणं गरजेचं आहे. तुम्ही कितीही पौष्टिक गोष्टींचं सेवन केलं आणि एक्सरसाईज केली नाही तर त्या खाण्याला काहीच महत्व राहत नाही.

३० वयानंतर घ्यावयाची काळजी

30 वयानंतर आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. कारण या वयात तुम्ही ज्या काही सवयी लावून घेता, त्यांचा प्रभाव भविष्यातील आरोग्यावर पडतो. निरोगी लाइफस्टाईल फॉलो करून तुम्ही अनेक आजारांचा धोका टाळू शकता.

- हेल्दी डाएट हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. यात फळं, हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, डाळी आणि कमी फॅट असलेल्या दुधाचं सेवन करा. जंक फूड, फास्ट फूड आणि शुगर असलेल्या पदार्थांचं सेवन करू नका.

- रोज कमीत कमी ३० मिनिटे एक्सरसाईज करावी. रोज साधारण ७ ते ८ तासांची पूर्ण झोप घ्यावी. तणाव, चिंता दूर करण्यासाठी अॅक्टिविटी करा. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्यावे. स्मोकिंग आणि मद्यसेवन आरोग्यासाठी नुकसानकारक आहे.

Web Title: Ayurveda doctor's claim these 3 foods you should eat after 35 years age for healthy long life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.