आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितले कर्टुल्याची भाजी खाण्याचे जबरदस्त फायदे, वाचाल तर रोज खाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 12:28 PM2024-07-26T12:28:27+5:302024-07-26T12:29:01+5:30

Kartula health benefits : बरेच लोक ही भाजी घेत नाहीत. पण एकदा जर तुम्ही कर्टुल्याची भाजी खाण्याचे फायदे वाचाल तर रोज ही भाजी खाल. 

Ayurveda doctors tells health benefits of kantola, Kartula or teasle gourd | आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितले कर्टुल्याची भाजी खाण्याचे जबरदस्त फायदे, वाचाल तर रोज खाल!

आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितले कर्टुल्याची भाजी खाण्याचे जबरदस्त फायदे, वाचाल तर रोज खाल!

Kartula health benefits : पावसाळा आला की, बाजारात वेगवेगळ्या रानभाज्या मिळतात. यांची टेस्ट तर चांगली लागतेच सोबतच यांच्या सेवनाने आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. तुम्ही बाजारात भाजी आणायला गेल्यावर अनेकदा कर्टुले बघितले असतील. बरेच लोक ही भाजी घेत नाहीत. पण एकदा जर तुम्ही कर्टुल्याची भाजी खाण्याचे फायदे वाचाल तर रोज ही भाजी खाल. 

आयुर्वेद डॉक्टर विलास शिंदे यांनी कर्टुल्याची भाजी खाण्याचे फायदे सांगणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. कर्टुल्याला कुठे कटुले कुठे कर्टुले म्हणतात तर कुठे करटोली म्हणतात तर काही भागांमध्ये यांना रानकारले असंही म्हणतात. 

कर्टुल्यामधील पोषक तत्वे

या भाजीमध्ये प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी1, बी2, बी3, बी5, बी6, बी9, बी12, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी2 आणि 3, व्हिटॅमिन एच, व्हिटॅमिन के, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पॉटेशियम, सोडियम, कॉपर, झिंक इत्यादी पोषकतत्वे आढळतात.

कर्टुल्याच्या भाजीचे फायदे

डॉक्टर विलास शिंदे यांच्यानुसार, तुम्हाला जर हृदयारोग, कोलेस्ट्रॉल वाढलं असेल, मधुमेह किंवा अस्थमा असेल किंवा टाळायचा असेल तर कर्टुल्याची भाजी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरते. तुम्हाला हाय ब्लड प्रेशर असेल तर ही भाजी खाऊन तुम्हाला फायदा मिळू शकतो. तसेच वात, पित्त सुद्धा ही भाजी कंट्रोलमध्ये ठेवते. या भाजीचं सेवन करून इम्यूनिटी वाढते, त्वचेसंबंधी समस्या दूर होतात व ब्लड शुगर कंट्रोल करण्यासही मदत मिळते.

कशी कराल कर्टुल्याची भाजी ? 

कारल्याप्रमाणे कर्टुल्याचे स्लाईस करा. कांदा, टॉमेटोच्या फोडणीवर कर्टुले  परतून वाफवा. यामध्ये आवडीनुसार हळद, तिखट, मसाला, धने-जिर्‍याची पूड, मीठ, शेंगदाण्याचा कूट मिसळून भाजी बनवा. जास्तीत जास्त लोक कर्टुल्याची साल काढून फेकतात. पण असं करू नये कारण यात जास्त पोषक तत्व असतात.

Web Title: Ayurveda doctors tells health benefits of kantola, Kartula or teasle gourd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.