अनेक गंभीर समस्या दूर करते आंबे हळद, आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितलं सेवनाची पद्धत...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 12:58 PM2024-10-04T12:58:00+5:302024-10-04T12:58:44+5:30

Amba Haldi : आल्यासारखी दिसणाऱ्या आंबे हळदीला आयुर्वेदातही फार महत्व आहे. कारण याचा वापर अनेक समस्या दूर करण्यासाठी केला जातो.

Ayurveda Dr told amazing benefits of amba haldi to fight asthma, cough, arthritis and many more | अनेक गंभीर समस्या दूर करते आंबे हळद, आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितलं सेवनाची पद्धत...

अनेक गंभीर समस्या दूर करते आंबे हळद, आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितलं सेवनाची पद्धत...

Amba Haldi : हळद आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. भारतातील घराघरांमध्ये हळदीच्या रोज वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो. आयुर्वेदातही हळदीला फार महत्व आहे. सामान्य हळद तर सगळेच रोज खातात. मात्र, आंबे हळदीचे फायदे अनेकांना माहीत नसतात. आंबे हळदीमध्ये करक्यूमिन नावाचं तत्व भरपूर असतं. तसेच आंबे हळद ही पिवळ्या हळदीपेक्षा चवीला थोडी कडवट असते.

आल्यासारखी दिसणाऱ्या आंबे हळदीला आयुर्वेदातही फार महत्व आहे. कारण याचा वापर अनेक समस्या दूर करण्यासाठी केला जातो. यात अनेक औषधी गुण असतात. या हळदीचे फायदे सांगणारा एक व्हिडीओ आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांनी पोस्ट केला आहे. 

डॉक्टर दीक्षा भावसार यांच्यानुसार, आंबे हळद एक अद्भुत आयुर्वेदिक मसाला आहे. ज्याचं सेवन तुम्ही रोज करू शकता. यात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट गुण असतात. महत्वाची बाब म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने याचा तुमच्या आहारात समावेश करू शकता.

त्वचा रोगावर रामबाण उपाय

डॉक्टरांनी सांगितलं की, आंबे हळदीच्या सेवनाने तुमची त्वचेवर होणारी खाज, सोबतच त्वचेसंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. या हळदीमध्ये असे सगळे गुण आढळतात जे त्वचा रोगावर उपचार करू शकतात.

पचनक्रिया चांगली होते

या हळदीमुळे पचन आणि चयापचय यात सुधारणा होते. कोणत्याही प्रकारची गॅस्ट्रिक समस्या, अपचन आणि आतड्यांची समस्या याने दूर करण्यास मदत मिळते. जर तुमचं पोट नेहमीच बिघडत असेल तर याचं सेवन करावं.

संधिवात होईल दूर

आंबे हळद तुमचा वात संतुलित करण्यासाठी मदत करते. आंबे हळद वातामुळे होणारी कोणतीही वेदना दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते.

दमा आणि खोकल्यावर रामबाण उपाय 

यात हळदीमध्ये अ‍ॅंटी-एलर्जी गुण असतात. जर कुणाला दमा, जुना खोकला, सर्दी आणि काही एलर्जी असेल तर या हळदीने या समस्या दूर होतात.

आंबे हळदीचं सेवन कसं कराल?

- अपचनाची समस्या दूर करण्यासाठी आंबे हळदीचे छोटे छोटे तुकडे करा. यात थोडं सैंधव मीठ आणि लिंबाचा रस टाका.

- त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी या हळदीचा कच्चा रस बनवा आणि १० ते १५ मिलीलीटर रस २ वेळा सेवन करा.

- खोकला, सर्दी, दमा आणि इम्यूनिटी वाढवण्यासाठी याचे छोटे छोटे तुकडे करा आणि मधासोबत सेवन करा.

- संधिवाताची समस्या दूर करण्यासाठी ही हळद कच्ची खाऊ शकता किंवा याच्या ज्यूसचं सेवन करा.

- एखादी जखम झाली असेल किंवा कशामुळे त्वचेवर सूज आली असेल तर वाळलेली आंबी हळद उगाळून त्यावर लावा. याने सूज कमी होईल आणि जखमही लवकर भरेल.

Web Title: Ayurveda Dr told amazing benefits of amba haldi to fight asthma, cough, arthritis and many more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.