काही लोकांसाठी घातक ठरू शकतं बदाम खाणं, आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 10:15 AM2023-11-30T10:15:29+5:302023-11-30T10:16:48+5:30
Health Tips : बदामाचा आपल्या डाएटमध्ये समावेश करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तुम्ही कच्चे बदाम खाऊ शकता.
Health Tips : बदाम सुपरफूड्सपैकी एक आहे ज्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. बदामाचं सेवन खूप आधीपासून केलं जात आहे. आयुर्वेदातही याचा आणि आरोग्याचा उल्लेख आहे. बदाम वात असंतुलन, नसांमध्ये वेदना, लकवा आणि इतर डीजेनेरेटिव डिजीजसाठी चांगलं फूड आहे. बदाम तसेच बदामामुळे शुक्राणुंची संख्याही वाढते, वीर्य गुणवत्ता व प्रमाणही वाढतं.
जर बदाम खाण्याच्या फायद्यांबाबत सांगायचं तर आयुर्वेद डॉक्टर चैताली राठोड यांच्यानुसार, बदामाच्या सेवनाने रक्तस्राव विकार, मासिक पाळीत जास्त रक्तस्राव, नाकातून रक्त येणे इत्यादी समस्या दूर होतात. तसेच याच्या सेवनाने स्मरणशक्तीही चांगली होते.
आयुर्वेदानुसार बदाम खाण्याची पद्धत
डॉक्टरने सांगितलं की, बदामाचा आपल्या डाएटमध्ये समावेश करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तुम्ही कच्चे बदाम खाऊ शकता. जास्त फायदा मिळवण्यासाठी बदाम भिजवून आणि साल काढून खाण्याचा सल्ला दिला जातो. बदाम भिजवून खाल्ल्याने पचनशक्ती वाढते आणि जास्त पोषक तत्व मिळतात.
एका दिवसात किती बदाम खावे?
डॉक्टरांनुसार, तुम्ही दररोज 5 बदाम खाऊ शकता. 7 किंवा 8 पेक्षा जास्त खाऊ नये. जास्त बदाम खाल्ल्याने आतड्यांचं आरोग्य कमजोर होऊ शकतं आणि गॅस्ट्रिक समस्यांमध्ये अपचनाचं कारण ठरू शकतं.
बदाम खाण्याची योग्य वेळ
डॉक्टरांनी सांगितलं की, बदाम खाण्याची सगळ्यात चांगली वेळ सकाळी नाश्त्याआधी असते. आपल्या दिवसाची सुरूवात बदामाने करा. यामुळे तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते.
कुणी खाऊ नये बदाम ?
डॉक्टरांनुसार, खोकला किंवा सर्दी असल्यावर बदाम खाणं टाळलं पाहिजे. आयुर्वेदात उल्लेख आहे की, बदाम खाल्ल्याने तुमचा कफ दोष वाढू शकतो. कारण खोकला आणि सर्दी झाल्यावर कफ दोष असंतुलित होत असतो. अशात बदाम खाणं टाळलं पाहिजे.