पानांपासून ते सालीपर्यंत, 'या' झाडाचे होतात अनेक फायदे, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 01:02 PM2024-02-20T13:02:24+5:302024-02-20T13:03:00+5:30

पोट आणि त्वचेसंबंधी समस्या दूर करण्यासाठी अनेक औषधं आहेत. पण ही औषधं महाग असतात, सोबतच त्यांचे साइड इफेक्टही खूप असतात.

Ayurveda Dr told health benefits of Neem leaves and uses | पानांपासून ते सालीपर्यंत, 'या' झाडाचे होतात अनेक फायदे, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले फायदे

पानांपासून ते सालीपर्यंत, 'या' झाडाचे होतात अनेक फायदे, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले फायदे

Neem Flower Benefits: आता हळूहळू थंडी कमी होईल आणि उन्हाळ्याला सुरूवात होईल. अशात आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागेल. कारण उन्ह वाढलं की, आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्याही वाढू लागतात. उन्हाळ्यात हायपर अ‍ॅसिडिटी, शरीरात जळजळ, त्वचेवर चट्टे, पुरळ, हीट स्ट्रोक सारख्या समस्या होतात. पोट आणि त्वचेसंबंधी समस्या दूर करण्यासाठी अनेक औषधं आहेत. पण ही औषधं महाग असतात, सोबतच त्यांचे साइड इफेक्टही खूप असतात.

आयुर्वेद डॉक्टर Dr Dixa Bhavsar Savaliya यांनी कडूलिंबाच्या पानांचे, सालीचे आणि फुलांचे काय काय फायदे होतात हे सांगितलं आहे. जर तुम्हाला कोणतंही नुकसान किंवा साइड इफेक्ट न होता वरील समस्या सोडवायच्या असतील तर कडूलिंबाची फुलं आणि कडूलिंबाच्या ताज्या पानांचा वापर करू शकता. महत्वाची बाब म्हणजे या उपचारासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही.

खाजेपासून मिळेल सुटका

उन्हाळ्यात खाज येण्याची समस्या वाढते, अशात हा उपाय ही समस्या दूर करण्यासाठी बेस्ट आहे. कडूलिंबाच्या फुलांमध्ये आणि पानांमध्ये अ‍ॅंटीसेप्टिक, अ‍ॅंटीमायक्रोबियल, अ‍ॅंटी-इचिंग, हीलिंग, कूलिंग गुण असतात. ज्यामुळे हे फायदेशीर आहे.

पोटातील जंतू आणि अॅसिडचा नाश

उन्हाळ्यात पोत आणि आतड्यांसंबंधी समस्याही वाढतात. खासकरून पोटात जंतू आणि अ‍ॅसिड तयार होण्याची समस्या जास्त बघायला मिळते. कडूलिंबाच्या फुलाच्या आणि पानांच्या कडवट टेस्टमुळे या समस्या दूर केल्या जाऊ शकतात.
रक्त होतं साफ आणि लिव्हर होतं मजबूत

डॉक्टरांनी सांगितलं की, या फूलं आणि पानांमध्ये रक्त साफ करणे आणि लिव्हरच्या कार्याला मदत करण्याची क्षमता असते. रक्त साफ करून त्वचेसंबंधी समस्या दूर करण्यासाठी याचा वापर करू शकता.

मलेरिया-तापात बेस्ट उपाय

या दिवसांमध्ये मलेरिया आणि ताप येण्याचा सगळ्यात जास्त धोका असतो. यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही कडूलिंबाच्या फुलांचा रस प्यायला पाहिजे. डॉक्टरांनुसार यात ज्वरनाशक गुण असतात.

पोटासाठी फुलांचा असा करा वापर

डॉक्टरांनुसार, या वातावरणात कडुलिबांच्या झाडांना नवीन पाने आणि फुलं येतात. तुम्ही फुलं किंवा पानांचा ताजा रस काढून तो सकाळी रिकाम्या पोटी 5 ते 10 मिली इतका घेऊन शकता. त्यानंतर अर्धा तास काहीच खाऊ नये.

त्वचेसाठी कसा कराल वापर

जर उन्हाळ्यात तुम्हाला त्वचेवर फोड, पुरळ किंवा खाजेची समस्या झाली असेल तर तुम्ही कडुलिंबाच्या पानाची आणि फुलांची पेस्ट तयार करा आणि ती प्रभावित भागावर लावा. याने फायदा होईल. खाज किंवा त्वचेसंबंधी कोणत्याही समस्या दूर करण्यासाठी कडुलिबांची पाने पाण्यात उकडून या पाण्याने आंघोळ केली तर फायदा होतो.

Web Title: Ayurveda Dr told health benefits of Neem leaves and uses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.