Turmeric Benefits: हळदीसोबत खा हे 5 पदार्थ, आयुर्वेदीक डॉक्टरांनी सांगितलं दूर होतील हे कितीतरी आजार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 10:39 AM2023-04-15T10:39:54+5:302023-04-15T10:40:15+5:30

Turmeric Benefits: हळदीमध्ये अनेक असे तत्व आढळतात जे तिला सगळ्यात शक्तीशाली जडीबुटी बनवतात.

Ayurveda Dr told mix these 6 foods with turmeric to beat 25 diseases together | Turmeric Benefits: हळदीसोबत खा हे 5 पदार्थ, आयुर्वेदीक डॉक्टरांनी सांगितलं दूर होतील हे कितीतरी आजार!

Turmeric Benefits: हळदीसोबत खा हे 5 पदार्थ, आयुर्वेदीक डॉक्टरांनी सांगितलं दूर होतील हे कितीतरी आजार!

googlenewsNext

Turmeric Benefits: हळद एक पॉवरफुल आयुर्वेदिक जडीबूटी आहे. हळदीचा वापर प्राचीन काळापासून वेगवेगळी औषधं आणि उपचारांसाठी केला जातो. हळदीला आयुर्वेदात हरिद्रा नावाने ओळखलं जातं. पदार्थांना चव आणि रंग देणाऱ्या हळदीला औषध म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

हळदीमध्ये अनेक असे तत्व आढळतात जे तिला सगळ्यात शक्तीशाली जडीबुटी बनवतात. यातील सगळ्यात महत्वाचं घटक म्हणजे 'करक्यूमिन' आहे. हेच तत्व सगळ्यात शक्तीशाली आहे. तसेच हळदीमध्ये अ‍ॅंटी-बायोटिक, एनाल्जेसिक, अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट, अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरी, अ‍ॅंटी-कॅन्सर आणि अ‍ॅंटी ऑक्सिडेंटच्या रूपात काम करतं.

जास्तीत जास्त लोक हळदीचा वापर केवळ भाजीत किंवा डाळीमध्ये टाकण्यासाठी करतात. पण हळदीचं सेवन वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांनी हळद कोणत्या पदार्थासोबत खाल्ल्याने याची पॉवर अधिक वाढते याबाबत सांगितलं.

हळदीचा सगळ्यात मोठा फायदा

डॉक्टरांनी सांगितलं की, हळदीचा वापर केवळ पदार्थांना रंग देणे किंवा टेस्ट देण्यासाठी नसतो तर अनेक समस्या दूर करण्यासाठीही केला जाऊ शकतो. हळदीबाबत सगळ्यात चांगली बाब म्हणजे याचा वापर आजार दूर करण्यासाठी आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो.

हळदीचे फायदे

जखमा लवकर भरतात

लिव्हरची सफाई करण्यास मदत

भूक वाढवण्यासाठी आणि पचन चांगलं होण्यासाठी

बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं

रक्तवाहिन्या चांगल्या राहतात

या आजारांचा उपाय आहे हळद

एनीमिया, वात, सांधीवात, कॅंडिडा, वजन कमी करणे, थकवा, ब्रोंकायटिस, सर्दी आणि खोकला, फुप्फुसात इन्फेक्शन, जखमा भरणे, मांसपेशी मजबूत करणे, मासिक पाळीची समस्या, त्वचेवर खाज, सर्जरीनंतरची रिकव्हरी, कॅन्सर, अनिद्रा, पार्किंसंस, अल्जाइमर, वॉटर रिटेंशन, पोटातील जंतू, सिस्टेमिक ल्यूपस एरिथेमेटोसस आणि टीबीसारख्या आजारांवर उपचार करण्यास हळदीची मदत होते.

हळदीचं सेवन कसं आणि का करावं?

फॅटी लिव्हरसाठी हळदीचं सेवन लिंबासोबत करावं.

इम्यून पॉवर वाढवण्यासाठी तूप आणि मधासोबत हळदीचं सेवन करावं.

वजन कमी करण्यासाठी आणि त्वचा रोग दूर करण्यासाठी कोमट पाण्यात हळदीचं सेवन करावं.

सर्दी-खोकला, जखमा आणि कॅल्शिअमची कमतरता दूर करण्यासाठी दुधासोबत हळदीचं सेवन करावं.

डायबिटीसमध्ये आवळ्यासोबत हळदीचं सेवन करावं

त्वचा आणि केसांच्या समस्येसाठी रामबाण आहे हळद

डॉक्टरांनी सांगितलं की, हळद एक्जिमा, सोरायसिस आणि फंगल इन्फेक्शन सारख्या त्वचा रोगांच्या उपचारासाठी खोबऱ्याच्या किंवा कडूलिंबाच्या तेलात मिक्स करून प्रभावित त्वचेवर लावा. पिंपल्स आणि सुरकुत्याही याने दूर होतात. हळदीचा चेहऱ्यावरील केस कमी करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.

Web Title: Ayurveda Dr told mix these 6 foods with turmeric to beat 25 diseases together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.