९९ टक्के लोक चुकीच्या पद्धतीने खातात दही, जाणून घ्या दही खाण्याची आयुर्वेदिक पद्धत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 10:55 AM2024-08-09T10:55:49+5:302024-08-09T10:56:17+5:30
How to Eat Curd : दह्याच्या नियमित सेवनाने पचन तंत्र चांगलं राहतं. दह्यात कॅल्शिअम भरपूर असल्याने हाडेही मजबूत होतात आणि दातही मजबूत होतात.
How to Eat Curd : दही खाणं हे आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीने फायदेशीर असतं. दह्यातून शरीराला अनेक फायदे मिळतात. लहान मुले असो वा मोठे लोक आवडीने रोज किंवा आठवड्यातून दोन ते तीन वेळा दही खातात. दह्यामध्ये गुड बॅक्टेरिया आणि प्रोबायोटिक्स असतात. ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. दह्याच्या नियमित सेवनाने पचन तंत्र चांगलं राहतं. दह्यात कॅल्शिअम भरपूर असल्याने हाडेही मजबूत होतात आणि दातही मजबूत होतात.
दह्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि डी सारखे पोषक तत्व असतात. जे इम्यून सिस्टीम मजबूत करण्यास मदत करतात. तसेच दह्यात कॅल्शिअम आणि फॉस्फोरससारखे तत्व असतात जे ऑस्टियोपोरोसिसपासून बचाव करतात.
आयुर्वेद एक्सपर्ट डॉक्टर रोबिन शर्मा यांच्यानुसार, दह्यापासून खूपसारे फायदे मिळतात. पण ९९ टक्के लोक दही चुकीच्या पद्धतीने खातात. डॉक्टरांचं मत आहे की, दह्यापासून पूर्ण फायदा मिळवण्यासाठी त्याचा योग्य पद्धतीने वापर केला पाहिजे.
हाडे होतात मजबूत
डॉक्टरांनुसार, भरपूर कॅल्शिअम असलेल्या दह्याने हाडे आणि दात मजबूत होतात. यात व्हिटॅमिन डी असतं जे कॅल्शिअमचं अवशोषण वाढवतात.
नाभि सरकल्यावर कसं खावं दही?
दह्यात हळद आणि गूळ मिक्स करून सकाळी नाश्त्यात खावं. याने पुन्हा पुन्हा नाभि सरकण्याची समस्या दूर होईल. तसेच याच्या सेवनाने आयबीएस आणि बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होईल.
हात-पायांची जळजळ असेल तर कसं खाल?
जर तुमच्या हात-पायांमध्ये जळजळ होत असेल तर तुम्ही दही तुमच्या हात आणि तळपायांवर घासा. असं केल्याने तुमची हात-पायांची जळजळ दूर होईल.
दही खाण्याची आयुर्वेदिक पद्धत
डॉक्टरांनुसार, दही कधीही एकटं खाऊ नका. जर तुम्हाला दह्याची शक्ती डबल करायची असेल तर यात मध, सैंधव मीठ किंवा कडीसाखर मिक्स करा.
उन्हाळ्यात कसं खाल दही?
डॉक्टरनुसार, उन्हाळ्यात दही कधीच एकटं खाऊ नये. उन्हाळ्यात दही खाताना त्यात पाणी मिक्स करा, लस्सी बनवा किंवा कोशिंबिर बनवून खावं.