छोटीशी चुकही ठरू शकते लठ्ठपणाचं कारण, जाणून घ्या आयुर्वेदातील पाणी पिण्याची योग्य पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 04:22 PM2022-06-17T16:22:18+5:302022-06-17T16:22:32+5:30

Drinking Water Tips: काही लोक जेवणाआधी पाणी पितात, तर काही लोक जेवणानंतर पाणी पितात. पण असं करणं योग्य आहे का? याबाबत आयुर्वेदात काही खास नियम आहेत. चला जाणून घेऊ हे नियम...

Ayurveda expert explains drinking water after or before meals can impair digestion | छोटीशी चुकही ठरू शकते लठ्ठपणाचं कारण, जाणून घ्या आयुर्वेदातील पाणी पिण्याची योग्य पद्धत!

छोटीशी चुकही ठरू शकते लठ्ठपणाचं कारण, जाणून घ्या आयुर्वेदातील पाणी पिण्याची योग्य पद्धत!

googlenewsNext

Drinking Water Tips: आपल्या शरीराला दिवसभर अॅक्टिव राहण्यासाठी जेवण आणि भरपूर प्रमाणात पाण्याची गरज असते. यांच्याशिवाय किंवा चुकीच्या पद्धतीने यांचं सेवन केलं तर शरीरात कमजोरीसोबत अनेक आजार जन्म घेतात. रूटीन आपल्या जीवनासाठी फार महत्वाचं आहे. तसेच काही छोटे मोठे बदल करून अनेक आजार आपण दूर ठेवू शकतो. ज्यातील एक सवय आहे दिवसभर पाणी पिऊन हायड्रेटेड राहणं. अशात जेव्हा जेवणासोबत पाणी पिण्याचा विषय येतो तेव्हा आपण सगळेच वेगवेगळ्या प्रकारे याचं सेवन करतो. काही लोक जेवणाआधी पाणी पितात, तर काही लोक जेवणानंतर पाणी पितात. पण असं करणं योग्य आहे का? याबाबत आयुर्वेदात काही खास नियम आहेत. चला जाणून घेऊ हे नियम...

काय आहे आयुर्वेदात पाणी पिण्याचा नियम?

आयुर्वेदिक डॉक्टर एश्वर्या संतोष सांगतात की, जेवणासोबत पाणी पिताना आयुर्वेदात सांगण्यात आलेल्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. असं करून पचनासंबंधी अनेक समस्यांपासून आपण स्वत:चा बचाव करू शकतो. आयुर्वेदात जेवणाआधी किंवा जेवणानंतर पाणी पिण्याचा सल्ला दिला जात नाही. तर काही वेळाच्या गॅपने जेवण करताना थोडं थोडं पाणी पिणं फायदेशीर मानलं आहे.

जेवणाआधी पाणी प्यावं का?

बरेच लोक जेवणाआधी एक ग्लास पाणी पिणं पसंत करतात. जेणेकरून आपण जेव्हा जेवण करून तेव्हा कमी कॅलरीचं सेवन करू. पण प्रत्यक्षात जेवणाआधी पाणी प्यायल्याने आपलं पोट भरतं आणि जेवण कमी जातं. अशात आपल्या शरीराला योग्य प्रमाणात पोषक तत्व मिळत नाहीत. त्यामुळे आयुर्वेदानुसार जेवणाआधी पाणी पिणं चुकीचं आहे. असं करून शरीरात कमजोरी आणि तुम्ही बारीक होण्याची शक्यता असते.

जेवण केल्यावर पाणी पिण्याचं काय?

अनेक लोक जेवण केल्यानंतर पाणी पिण्याचा सल्ला देतात. याचं लॉजिक हे सांगतं की, जेवण केल्यावर पाणी प्यायल्याने आपण चांगल्याप्रकारे अन्न पचवू शकतो. पण असं नसतं. आयुर्वेदानुसार जेवण केल्यानंतर पाणी प्यायल्याने लठ्ठपणा येतो.

मग कसं प्यावं पाणी?

आयुर्वेद डॉक्टर सांगतात की, जेवण करताना एक एक घोट पाणी पिणं सर्वात चांगलं असतं. याने अन्नाचे मोठे मोठे घास तोडण्यास मदत मिळते. ज्याने पचनक्रिया चांगल्या प्रकारे होते. त्याशिवाय जेवणादरम्यान तुम्ही पाणी प्यायल्याने तुम्ही ओव्हरइटिंगपासून वाचू शकता. जे अनेकदा वजन वाढण्याचं कारण असतं.

थंड की गरम पाणी?

डॉक्टर सांगतात की, पचनक्रिया चांगली होण्यासाठी आणि पचनतंत्र चांगलं राहण्यासाठी आयुर्वेदात नेहमीच कोमट पाण्यासोबत जेवण करण्याचा सल्ला दिला जातो. कोमट पाणी शरीरातील रक्तप्रवाह योग्यप्रकारे व्हावा यासाठीही पिण्याचा सल्ला दिला जातो.

Web Title: Ayurveda expert explains drinking water after or before meals can impair digestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.