सगळे उपाय करून झाले असतील तर 'या' उपायाने पोटावरील चरबी करा दूर!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 09:58 AM2019-11-22T09:58:27+5:302019-11-22T10:03:25+5:30
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, शरीराचं वजन बरंच कमी झालेलं असतं पण समोर आलेलं पोट काही केल्या कमी होत नाही. म्हणजे पोटावरील चरबी कमी होत नाही.
(Image Credit : studyfinds.org)
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, शरीराचं वजन बरंच कमी झालेलं असतं पण समोर आलेलं पोट काही केल्या कमी होत नाही. म्हणजे पोटावरील चरबी कमी होत नाही. कारणही तसंच आहे. म्हणजे शरीराचं काही पाउंड्स वजन कमी करणं वेगळं आणि फक्त पोटावरील चरबी कमी करणं वेगळी गोष्ट आहे. यावर जगप्रसिद्ध लेखक बॉब ल्यूथर यांनी नुकताच एक लेख लिहिलाय.
(Image Credit : style.tribunnews.com)
बॉब यांच्यानुसार, बॉडी वेटच्या तुलनेत पोटावरील चरबी कमी वेगाने घटण्याचं कारण म्हणजे शरीराच्या इतर भागात जमा झालेली चरबी दूर करणं बॉडी मेकॅनिजमसाठी वेगळी बाब असते आणि पोटावरील चरबी कमी करणे वेगळी. तुम्ही सुद्धा पोटावरील चरबी दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले असतील. आणि हे उपाय करून तुम्ही थकले असाल तर तुम्ही आयुर्वेदाचा मार्ग निवडायला पाहिजे. हा मार्ग सोपा आणि फायदेशीर आहे. याने तुम्हाला पोटावरील चरबी दूर करता येते.
(Image Credit : pulse.ng)
कारण पोटावरील चरबी वाढण्याचं मुख्य कारणे म्हणजे आळशी लाइफस्टाईल, जास्त झोपेणे, शारीरिक हालचाल कमी करणे, योग्य आाहार न घेणे हे आहेत. या कारणांनी पोटावर चरबी जमा होते. जी नंतर कमी करण्यासाठी फार जास्त मेहनत घ्यावी लागते. अनेक रिसर्च आणि अनुभवाच्या आधारावर बॉब सांगतात की, ही चरबी आयुर्वेदिक पद्धतीने खाण्या-पिण्याची योग्य सवय लावून कमी केली जाऊ शकते.
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आयुर्वेदानुसार सांगण्यात आलेल्या खाण्या-पिण्याच्या नियमांना फॉलो केलं पाहिजे. याने मेटाबॉलिज्म आणि डायजेशन चांगलं होतं. आहारातील काही हर्ब्स शरीरातील जमा चरबी घटवण्यास मदत करतात. आयुर्वेदात डाएटसोबतच वर्कआउट आणि वॉकने तुम्ही पोटावरील चरबी कमी करू शकता.