फुप्फुसात जमा झालेला कफ झटक्यात येईल बाहेर, डॉक्टरांनी सांगितला 'हा' आयुर्वेदिक उपाय...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 11:26 AM2024-08-16T11:26:23+5:302024-08-16T11:35:41+5:30
अनेकांना हे माहीत नसतं की, छातीत जमा झालेला कफ तुम्ही घरातील एक गोष्ट वापरून बाहेर काढू शकता.
सर्दी-खोकला फारच कॉमन समस्या आहेत. पण जर फुप्फुसांमध्ये कफ जमा झाला तर स्थिती फारच गंभीर होते. खोकून खोकून व्यक्तीची हालत खराब होते. छातीत वेदनाही होतात. फुप्फुसात कफ जमा झाल्याने इन्फेक्शन किंवा सीओपीडी आजारही होऊ शकतो. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, छातीत जमा झालेला कफ तुम्ही घरातील एक गोष्ट वापरून बाहेर काढू शकता.
या आयुर्वेदिक उपायाने फुप्फुसांमध्ये जमा झालेला कफ एका झटक्यात बाहेर निघेल. हा उपाय लहान मुलांपासून ते मोठ्यांसाठीही फायदेशीर आहे. नॅचरोपॅथी स्पेशलिस्ट डॉ. निताशा गुप्ता यांच्यानुसार, बदलत्या वातावरणात हा उपाय नक्की करा. याने सर्दी, खोकला ताप लगेच दूर होण्यास मदत मिळेल.
डॉक्टरांनुसार सर्दी, खोकला, ताप या समस्या दूर करण्यासाठी मोठ्या वेलचीचा वापर करू शकता. याचा वापर करून लहान मुले असो वा मोठे त्यांच्या छातीत जमा झालेला कफ दूर होण्यास मदत मिळते.
सर्दी खोकल्याचं औषध
- आधी १० ते १२ मोठ्या वेलची घ्या.
- आता या पॅनमध्ये टाकून चांगल्या भाजा.
- आता वेलची काही वेळ थंड होऊ द्या.
- नंतर या वेलचीची पावडर तयार करा.
- हे पावडर चांगलं गाळून घ्या.
गाळून झाल्यावर मोठ्या वेलचीच साल फेकण्याची चूक करू नका. यानेही तुम्हाला आराम मिळण्यास मदत होईल. या सालीचा तुम्ही हर्बल चहा तयार करू शकता. याच्या सेवनाने इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
पावडरने तयार करा कफाचं औषध
- गाळलेलं पावडर १ ते २ महिने तुम्ही स्टोर करून ठेवू शकता.
- ६ महिने ते १ वर्षाच्या मुलांना ३ ते ४ चिमुट पाडवर थोड्या मधामध्ये टाकून सकाळी, दुपारी आणि रात्री खायला द्या.
- १ वर्ष ते ५ वर्षाच्या मुलांना एक चतुर्थांश चमचा पावडर सकाळी आणि सायंकाळी मधासोबत द्या.
- ५ वर्ष ते वयस्कांना १ चमचा पावडर सकाळी आणि सायंकाळी मधासोबत मिक्स करून द्यावे.