केळी खाल्ल्यानंतर एक तास करू नये हे काम, होऊ शकतात समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 02:20 PM2023-06-27T14:20:59+5:302023-06-27T14:22:02+5:30
Banana Eating Rules: चरक संहितेमध्ये सांगण्यात आलं आहे की, केळी खाताना किंवा नंतर काही वेळासाठी काही चुका करू नये. याने शरीराला नुकसान पोहोचू शकतं.
Banana Eating Rules: आयुर्वेद हजारो वर्ष जुनी भारतीय चिकित्सा आहे. ज्यात वेगवेगळ्या आजारांचे उपाय सांगितले आहे. आयुर्वेद शक्तीशाली बनवण्यासाठी महर्षि चरक यांचं मोठं योगदान आहे. त्यांनीच चरक संहितेची रचना केली. हजारो वर्ष जुनं पुस्तक वाचूनच आजही आयुर्वेदिक डॉक्टर बनता येतं.
चरक संहितेमध्ये सांगण्यात आलं आहे की, केळी खाताना किंवा नंतर काही वेळासाठी काही चुका करू नये. याने शरीराला नुकसान पोहोचू शकतं. ही माहिती मलेशियाचे मेडिकल न्यूट्रिशनिस्ट विपिन यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. चला जाणून घेऊ याबाबत...
1 तास पिऊ नका पाणी
आयुर्वेदात कोणतंही फळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्यास मनाई केली आहे. हा नियम केळी खाण्यावर लागू पडतो. हे फळं पचनाला जड असतं आणि पाण्यामुळे गॅस, बद्धकोष्ठता, पोटदुखी, अॅसिडिटीची समस्या होऊ शकते. केळी खाल्ल्यावर 1 तासाच्या अंतराने तुम्ही पाणी पिऊ शकता.
रात्री खाऊ नये केळी
आयुर्वेदानुसार, केळं रात्री खाऊ नये. हे फळ कफ वाढवणारं मानलं जातं. त्यामुळे हे रात्री खाल्ल्याने कफ, खोकला, छातीमध्ये जडपणा, छातीत वेदना होऊ शकते. केळी खाण्याची योग्य वेळ दिवसाच आहे.
कशासोबत खाऊ नये केळ
दूध-केळी किंवा बनाना शेकला बॉडी बनवण्याचा देशी उपाय मानला जातो. पण आयुर्वेदात याला शरीरासाठी नुकसानकारक मानलं जातं. केळी आणि दूध-दही इत्यादी डेअरी प्रॉडक्ट कफ वाढवण्याचा काम करतात. हे सोबत खाल्ल्याने शरीरात कफ दोष वाढू शकतो आणि पचनही खराब होतं.