Health Tips : आयुर्वेद डॉक्टरांनी दिला ही खास भाजी खाण्याचा सल्ला, पाइल्ससोबत दूर होतात हे 4 आजार..
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 04:58 PM2022-06-24T16:58:08+5:302022-06-24T17:12:08+5:30
Health Tips : अनेकजण या आजाराबाबत सांगण्यास लाजतात. अशात ते डॉक्टरांकडे जाण्याऐवजी घरगुती उपाय करतात. अशाच लोकांसाठी आम्ही एक रामबाण उपाय घेऊन आलो आहोत.
Health Tips : मुळव्याध आजाराबाबत तर तुम्ही ऐकलं असेलच, पण ज्यांना हा आजार होतो त्यांचं बसणंही मुश्कील होऊन जातं. मुळव्याध ही मलाशयाजवळ येणारी सूज असते. एका रिपोर्टनुसार, 50 टक्के लोकांना वयाच्या 50 वर्षापर्यंत मुळव्याधीचा अनुभव येतो. पण अनेकजण या आजाराबाबत सांगण्यास लाजतात. अशात ते डॉक्टरांकडे जाण्याऐवजी घरगुती उपाय करतात. अशाच लोकांसाठी आम्ही एक रामबाण उपाय घेऊन आलो आहोत.
आयर्वेद डॉक्टर ऐश्वर्या संतोष यांनी मुळव्याधसाठी एक फारच प्रभावी भाजीबाबत आपल्या इन्स्टावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी सांगितलं की, सूरनचं छाससोबत सेवन केलं तर मुळव्याधीची समस्या बरी होते. इतकंच नाही तर हे खाल्ल्याने पोटासंबंधी अनेक समस्याही दूर होतात.
काय आहे मुळव्याध?
मुळव्याध हा एक असा आजार आहे ज्यात मलाशय मार्गात आतून आणि बाहेरून सूज येते. यामुळे बाहेरच्या आणि आतील बाजूस काही मांस जमा होतं. यातून रक्तही येतं आणि वेदनाही भरपूर होते. ही समस्या जास्तकरून जास्त मसालेदार पदार्ख खाणाऱ्या लोकांना होते. त्यासोबतच फॅमिली हिस्ट्रील तरीही व्यक्तीला हा आजार होतो.
डॉक्टर ऐश्वर्या यांनी सांगितलं की, मुळव्याध झाला असेल तर सूरन खाणं फार फायदेशीर ठरतं. यासोबतच सूरन जुलाब, पोटदुखी, कृत्रिण संक्रमण आणि पचनासंबंधी समस्याही दूर करण्यास मदत करतं.
कसं करावं सेवन?
एक सूरन उन्हात वाळत घाला
त्याला कुटून किंवा बारीक करून पावडर बनवा
सूरनचं पाच ग्रॅम पावडर घ्या आणि ते छासमध्ये मिश्रित करून सेवन करा.
पोटासाठी फायदेशीर सूरन
सूरनमध्ये कॅलरी, फॅट, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, पोटॅशिअम आणि फायबरसोबतच व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन बी1, व्हिटॅमिन ए आणि बीटा केरोटीनही आढळतं. जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतं.