शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणारं नॅचरल डिटॉक्स ड्रिंक, लिव्हर-किडनीची होईल सफाई!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 03:11 PM2024-11-08T15:11:20+5:302024-11-08T15:55:48+5:30
Detox Drink : जर तुम्हाला शरीरात जमा हे अनावश्यक आणि विषारी तत्व बाहेर काढायचे असतील आणि लिव्हर व किडनींना निरोगी ठेवायचे असेल तर यासाठी एक आयुर्वेदिक उपाय आहे.
Detox Drink : शरीरात पोषक तत्व पचन झाल्यानंतर त्यातून मेटाबॉलिक वेस्ट तयार होतं. ही वेस्ट म्हणजे विषारी तत्व विष्ठेच्या माध्यमातून शरीरातून बाहेर पडत नाहीत. अनेक हे पदार्थ शरीराच्या वेगवेगळ्या भागात जाऊन जमा होतात. लिव्हर आणि किडनी शरीरातील हे अनावश्यक पदार्थ बाहेर काढण्यासाठी मेहनत करत असतात. या अनावश्यक आणि विषारी पदार्थांमुळे सगळ्यात आधी हेच अवयव खराब होतात.
जर तुम्हाला शरीरात जमा हे अनावश्यक आणि विषारी तत्व बाहेर काढायचे असतील आणि लिव्हर व किडनींना निरोगी ठेवायचे असेल तर यासाठी एक आयुर्वेदिक उपाय आहे. या आयुर्वेदिक उपायाने शरीर आतून साफ होईल. महत्वाची बाब म्हणजे हा उपाय २४ तासात शरीरातील हे अनावश्यक तत्व बाहेर काढेल.
नॅचरल डिटॉक्स ड्रिंकसाठी साहित्य
दोन ग्लास पाणी
एक इंच आल्याचा तुकडा
२ छोटे दालचीनीचे तुकडे
२ छोट्या वेलची
१ छोटा चमचा जिरे
१ छोटा चमचा ओवा
२ ग्लास पाण्यात या गोष्टी टाका आणि हलक्या आसेवर पाणी अर्ध होऊ द्या. डॉ. निशांत गुप्ता यांच्यानुसार, हे ड्रिंक तुम्ही सकाळी आणि सायंकाळी प्याल तर शरीर आतून डिटॉक्स होईल.
लिव्हर आणि किडनी निरोगी राहील
जर तुमच्या लिव्हर आणि किडनीमध्ये विषारी तत्व जमा झाले असतील तर हे ड्रिंक तुमची समस्या दूर करू शकता. फॅटी लिव्हरच्या रूग्णांसाठी हे ड्रिंक खूप फायदेशीर आहे. तसेच किडनीच्याही सामान्य समस्या याने दूर होतील.
अपचन आणि गॅस
काही चुकीचं खाण्या-पिण्यात आलं असेल आणि शरीराची फार हालचाल होत नसेल तर अपचन किंवा गॅसची समस्या होणं कॉमन आहे. जर तुम्हालाही नेहमीच या समस्या होत असतील तर हे डिटॉक्स ड्रिंक तुमची मदत करू शकतं.
यूरिक अॅसिड व थायरॉईड
यूरिक अॅसिड वाढल्याने किडनी स्टोन आणि संधिवातचा धोका वाढतो. डॉक्टरांनी सांगितलं की, या डिटॉक्स ड्रिंकने यूरिक अॅसिडचं प्रमाण कमी होईल. तसेच थायरॉईडची समस्या देखील कमी होईल.