दात चमकवण्यासाठी आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितले उपाय, फक्त ५ रूपयात दूर होईल पिवळेपणा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 11:25 AM2024-11-27T11:25:14+5:302024-11-27T11:25:53+5:30

White Teeth Home Remedies : आयुर्वेद डॉक्टर विवेक जोशी यांनी दातांवरील पिवळेपणा दूर करण्याचे काही नॅचरल उपाय सांगितले आहेत. महत्वाची बाब म्हणजे कमी खर्चात तुम्ही दातांवरील पिवळेपणा दूर करू शकता.

Ayurvedic doctor told easy and effective home remedies for teeth whitening | दात चमकवण्यासाठी आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितले उपाय, फक्त ५ रूपयात दूर होईल पिवळेपणा!

दात चमकवण्यासाठी आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितले उपाय, फक्त ५ रूपयात दूर होईल पिवळेपणा!

White Teeth Home Remedies : दात पिवळे येणे ही एक कॉमन समस्या आहे. जास्तीत जास्त लोकांना ही समस्या होते. अशात चारचौघांमध्ये मोकळेपणाने हसताही येत नाही. तसेच तुमचा आत्मविश्वासही कमी होतो. दातांवर पिवळेपणा म्हणजे प्लेक असतो, जो दातांवर चिकटतो. हा स्वच्छ केला नाही तर टार्टरचं रूप घेतो. नंतर दात आणि हिरड्यांवर चिकटतो. 

पिवळ्या दातांमुळे दातांमध्ये वेदना, रक्त येणे, कमजोर होणे, पायरिया, श्वासाची दुर्गंधी, दातांचा तुकडा पडणे यांसारख्या समस्या होतात. अशात दात मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी दातांवरील पिवळेपणा दूर करणं गरजेचं ठरतं.

आयुर्वेद डॉक्टर विवेक जोशी यांनी दातांवरील पिवळेपणा दूर करण्याचे काही नॅचरल उपाय सांगितले आहेत. महत्वाची बाब म्हणजे कमी खर्चात तुम्ही दातांवरील पिवळेपणा दूर करू शकता.

डॉक्टरांनी सांगितलं की, दात चमकदार करण्यासाठी आणि पिवळेपणा दूर करण्यासाठी सगळ्यात आधी केमिकल्स असलेल्या पेस्टचा वापर करणं बंद करा. याने दात आणि हिरड्या खराब होण्याचा धोका असतो.

हळद आणि काळं मीठ

अर्धा चमचा हळ पावडर घ्या आणि त्यात थोडं तेल मिक्स करा. नंतर त्यात एक ते दोन चिमूट काळं मीठ टाका. हे चांगलं मिक्स करून दातांवर घासा. हवं तर हे मिश्रण ब्रशच्या मदतीनेही दातांवर घासू शकता.

मेथीच्या बीया

डॉक्टरांनी सांगितलं की, दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही मेथीच्या बियांचाही वापर करू शकता. मेथीच्या दाण्यांचं बारीक पावडर तयार करा. हे सकाळी आणि सायंकाळी दातांवर घासा. काही दिवसात पिवळेपणा दूर होईल.

Web Title: Ayurvedic doctor told easy and effective home remedies for teeth whitening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.