आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितली एका खास चटणीची रेसिपी, खाल तर अनेक समस्या होतील दूर...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 01:53 PM2024-06-25T13:53:13+5:302024-06-25T13:54:52+5:30
Green Chutney : चटणीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. कोथिंबिर आणि पुदीन्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के भरपूर असतात. त्याशिवाय हिरव्या चटणीमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात.
Green Chutney : भारतीय लोक जेवणामध्ये वेगवेगळ्या चटणी खात असतात. खासकरून अनेकजण मिरच्यांचा ठेचा, पुदीना आणि कोथिंबिरची चटणी जेवणासोबत खाणं पसंत करतात. महत्वाची बाब म्हणजे या चटणी खाऊन टेस्ट तर चांगली लागतेच सोबतच याने आरोग्यालाही अनेक फायदे होतात. काही चटण्यांमुळे इम्यूनिटी वाढते, काहींमुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं तर काहींमुळे इतर काही फायदे.
कोंथिबिर, पुदीन्याची पाने, हिरवी मिरची, लसूण, आलं, लिंबाचा रस आणि काही मसाले टाकून बनवलेली चटणी टेस्टलाही चांगली लागते आणि आरोग्यालाही अनेक फायदे होतात.
चटणीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. कोथिंबिर आणि पुदीन्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के भरपूर असतात. त्याशिवाय हिरव्या चटणीमध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. तसेच याच्या नियमित सेवनाने शरीराला अनेक फायदे मिळतात.
आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांनी एका खास चटणीची माहिती दिली आहे. त्यांनी इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या हिरव्या चटणीने इम्यून सिस्टीम मजबूत होतं, ब्लड शुगर कंट्रोल होते, मानसिक आरोग्य चांगलं राहतं, झोप चांगली लागते, थायरॉइडची समस्या कमी होते, भूक कंट्रोल होते, कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशर कमी होतं, थकवा दूर होतो आणि केसगळतीची समस्याही कमी होते.
चटणी बनवण्याचं साहित्य
थोडी कोथिंबिर, १० ते १५ पुदीन्याची पाने, १० ते १५ कढीपत्त्याची पाने, १/२ छोटा, चमचा कच्चे आंबे किंवा आवळे, २ हिरव्या मिरच्या, आल्याचा एक छोटा तुकडा, २ लसणाच्या कळ्या, चवीनुसार काळं मीठ, जिरं पावडर अर्धा चमचा, मुठभर भाजलेले चणे, १ छोटा चमचा सूर्यफुलाच्या आणि भोपळ्याच्या बीया, अर्ध्या लिंबाचा रस...
कशी बनवाल चटणी?
या सगळ्या गोष्टी मिक्स करून मिक्सरमधून किंवा पाट्यावर बारीक वाटून घ्या. तुमची चटणी खाण्यासाठी तयार आहे. जेवण करताना तुम्ही ही चटणी खाऊ शकता. ही चटणी तुम्ही आठवडाभर फ्रिजमध्ये स्टोर करू शकता.
हिरव्या चटणीचे फायदे
वर सांगण्यात आलेल्या फायद्यांशिवाय याचे त्वचेला फायदे होतात. ऊर्जा लेव्हल वाढते, पिंपल्स कमी होतात, डोळे चांगले राहतात तसेच तुमचं रक्तही शुद्ध राहतं. त्यासोबतच या चटणीने तुमचं लिव्हरही डिटॉक्स होतं.