'या' आर्युवेदिक उपायांनी नियंत्रित करता येऊ शकतो दमा, जाणून घ्या तज्ज्ञांकडूनच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 06:09 PM2022-05-08T18:09:17+5:302022-05-08T18:11:15+5:30

आयुर्वेदिक उपायांनी दमा नियंत्रित ठेवता येऊ शकतो.

ayurvedic remedies for asthma | 'या' आर्युवेदिक उपायांनी नियंत्रित करता येऊ शकतो दमा, जाणून घ्या तज्ज्ञांकडूनच

'या' आर्युवेदिक उपायांनी नियंत्रित करता येऊ शकतो दमा, जाणून घ्या तज्ज्ञांकडूनच

googlenewsNext

दम्याच्या आजारावर कोणताही ठोस इलाज नाही आणि सामान्यतः लक्षणांवर आधारित उपचार केले जातात. आयुर्वेद डॉक्टर दम्याच्या उपचारांसाठी अनेक औषधी वनस्पती वापरतात, ज्यात हिस्टामाइन, ब्रोन्कोडायलेटिंग आणि दमाविरोधी गुणधर्म असल्याचा दावा केला जातो. दम्याच्या लक्षणांबद्दल बोलायचे झाल्यास रुग्णाला श्वासोच्छवासाचा त्रास, छातीत घट्टपणा किंवा दुखणे, श्वास सोडताना घरघर येणे. याशिवाय श्वासोच्छवास किंवा खोकल्यामुळेही रुग्णाला झोपेचा त्रास होतो. वेगवेगळ्या लोकांमध्ये त्याची लक्षणे वेगवेगळी (Lungs care tips) असू शकतात.

HealthSite.com मध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्तानुसार, आयुर्वेदात असंतुलित कफ, वात आणि पित्त दोषांना दम्याचे कारण सांगितले आहे. ज्यामुळे कोरडा खोकला, कोरडी त्वचा, चिडचिड, ताप, चिंता आणि बद्धकोष्ठता येते. दम्यासाठी आयुर्वेदिक उपचार हा देखील एक चांगला पर्याय आहे. वेद क्योरचे संस्थापक आणि संचालक डॉ. विकास चावला यांच्या मते, आयुर्वेदिक उपायांनी दमा नियंत्रित ठेवता येऊ शकतो.

हर्बल टी
अस्थमाचे रुग्ण त्यांची लक्षणे कमी करण्यासाठी विविध औषधी वनस्पतींपासून बनवलेला हर्बल चहा नियमितपणे पिऊ शकतात. डॉ. चावला यांच्या मते, आलं, ओवा, तुळस आणि काळी मिरी यांच्या मिश्रणातून बनवलेला हर्बल चहा अस्थमाच्या रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो, कारण तो कफ दूर करण्यात फायदेशीर आहे.

मध आणि कांदा
दम्याचा झटका आल्यास श्वासोच्छवास नीट करण्यासाठी, एका ग्लासमध्ये थोडी काळी मिरी, सुमारे 1 चमचे मध आणि थोडा कांद्याचा रस मिसळा आणि हळूहळू पाजा. परिस्थिती फार बिघडण्यापूर्वी आपण नैसर्गिक गोष्टींचा वापर करू शकतो.

मोहरीच्या तेलाने मालिश -
दम्याच्या रुग्णाच्या छातीवर मोहरीचे तेल कोमट करून त्याची मालिश केल्यास आराम मिळतो. मसाज केल्याने फुफ्फुसांना ऊब मिळते, ज्यामुळे छातीत जमा झालेला कफ निघून जातो आणि श्वास घेणे सोपे होते.

हळद -
कर्क्युमिन हा हळदीमध्ये आढळणारा सर्वात शक्तिशाली घटक आहे आणि त्यामुळे हळदीचा रंग पिवळा असतो. हळदीमध्ये काही औषधी आणि अँटिऑक्सिडंट घटक असतात, त्यामध्ये जळजळ रोखण्याची क्षमता असते. दम्यासाठी हे गुणकारी आहे. यासाठी दुधात हळद, हळदीचे पाणी किंवा चहा पिऊ शकता.

Web Title: ayurvedic remedies for asthma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.