जुलाब, संधिवात, लिव्हरवरील सूज कमी करणारे आयुर्वेदिक उपाय, लगेच मिळेल आराम!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 12:20 PM2024-11-16T12:20:43+5:302024-11-16T12:32:42+5:30

आयुर्वेद डॉक्टर गुरुसेवक सिंह यांनी काही आयुर्वेदिक उपाय सांगितले आहेत ज्यांद्वारे तुम्ही या समस्या दूर करू शकता.

Ayurvedic remedies to treat watery stool and stomach pain, obesity, migraine, joint pain and liver cirrhosis | जुलाब, संधिवात, लिव्हरवरील सूज कमी करणारे आयुर्वेदिक उपाय, लगेच मिळेल आराम!

जुलाब, संधिवात, लिव्हरवरील सूज कमी करणारे आयुर्वेदिक उपाय, लगेच मिळेल आराम!

थंडीला आता सुरूवात झाली आहे आणि या दिवसांमध्ये इम्यूनिटी कमजोर झाल्याने वेगवेगळ्या आजारांचा धोकाही वाढतो. या दिवसात जुलाब, वजन वाढणे, मायग्रेन आणि जॉईंट्समध्ये वेदना अशा समस्या होऊ लागतात. अशात आयुर्वेद डॉक्टर गुरुसेवक सिंह यांनी काही आयुर्वेदिक उपाय सांगितले आहेत ज्यांद्वारे तुम्ही या समस्या दूर करू शकता.

जुलाब दूर करण्यासाठी...

अर्धा चमचा जिरे सकाळी आणि सांयकाळी चावून खाल्ल्याने तुम्हाला ही समस्या दूर करण्यास मदत मिळू शकते. जिऱ्यानंतर थोडं कोमट पाणी प्यावे. याने तुमची जुलाबाची समस्या दूर होण्यास मदत मिळेल.

गुडघेदुखी दूर करणारा उपाय

200 ग्रॅम तिळाचं तेल, लसणाच्या कळ्या आणि २० लवंग एकत्र गरम करा. या तेलाने मालिश केल्याने गुडघेदुखीची समस्या दूर होण्यास मदत मिळेल. या तेलाने रात्री मालिश करावी.

मायग्रेनसाठी उपाय

मायग्रेनची समस्या दूर करण्यासाठी अश्वगंधा पावडर घ्या. एक चमचा पावडर एक ग्लास दुधासोबत सेवन केल्याने तुम्हाला आराम मिळेल. यासाठी थंड दूध घ्यावं.

लिव्हर सोरायसिस

एक लिटर पाण्यात काकडी आणि लिंबाचे स्लाइस आणि पाच पदीन्याची पाने टाका. हे पाणी एक तासासाठी झाकून ठेवा. नंतर कापडाने गाळून घ्या. हे पाणी दर अर्ध्या तासाने सेवन करा. याने लिव्हरसंबंधी समस्या दूर होण्यास मदत मिळेल.

वजन कमी करण्यासाठी

अर्धा कप कोमट पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे अॅलोवेरा गर आणि दोन चमचा आवळा मिक्स करा. तसेच यात एक चमचा आल्याचा रसही टाका. याचं रिकाम्या पोटी दोन महिने सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत मिळेल. 
 

Web Title: Ayurvedic remedies to treat watery stool and stomach pain, obesity, migraine, joint pain and liver cirrhosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.