ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी घ्या हे ५ हेल्दी ड्रिंक, हार्ट अटॅकचा धोका टाळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 11:27 AM2018-09-06T11:27:08+5:302018-09-06T11:27:55+5:30
उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना सल्ला दिला जातो की, जास्त मीठ आणि जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाणे टाळावे. त्यांच्या आहारात नेहमी पालेभाज्या, फळं आणि लीन प्रोटीन असावेत.
(Image Credit : TheHealthSite.com)
कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, प्रत्येक तीन भारतीयांमधील एक व्यक्ती उच्च रक्तदाब(ब्लड प्रेशर), हृदय रोग आणि कार्डिओवॅस्कुलर आजारांनी ग्रस्त आहेत. औषधे उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करतात, पण तो चांगला करण्यासाठी योग्य आणि चांगला आहार घेणे गरजेचे आहे. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना सल्ला दिला जातो की, जास्त मीठ आणि जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाणे टाळावे. त्यांच्या आहारात नेहमी पालेभाज्या, फळं आणि लीन प्रोटीन असावेत.
आरोग्य तज्ज्ञानुसार, कॅफीनयुक्त पेय आणि अल्कोहोल सेवन टाळलं तर उच्च रक्तदाब कमी केला जाऊ शकतो. कारण दोन्ही गोष्टी आरोग्यासाटी घातक आहेत. मात्र काही असेही पदार्थ आहेत जे उच्च रक्तदाब दूर करण्यास मदत करतात. अशाच काही पेयांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि इतर हृदयासंबंधी आजार कमी करण्यास तुम्हाला मदत करतात.
१) अॅपल सायडर व्हिनेगर
अॅपल सायडर व्हिनेगर या यादीत सर्वात वर आहे. यात पोटॅशिअम अधिक असतं. याने शरीरात जास्त प्रमाणात असलेलं सोडियम आणि विषारी पदार्थ बाहेर काढले जातात. यात असलेलं रेनिन इंजाइम रक्तदाह कमी करण्यास मदत करतं. काही थेंब मध आणि अॅपल सायडर व्हिनेगर एक ग्लास पाण्यामध्ये मिश्रीत करुन सकाळी सेवन करुन शकता.
२) लिंबू पाणी
लिंबू पाणी तुमच्या पेशींना स्वच्छ करतं. यासोबतच रक्तवाहिन्यांना नरम आणि लवचिक करतं. याने रक्तदाब कमी होतो. लिंबू पाण्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं जे शरीरातील मुक्त कण दूर करण्यासाठी अॅंटी-ऑक्सिडेंटच्या रुपात काम करतं. रोज सकाळी एक ग्लास लिंबू पाणी प्यायल्यास फायदा होतो.
३) मेथीचं पाणी
(Image Credit : Times Now)
मेथीच्या पाण्यामध्ये फायबर अधिक प्रमाणात असतं. जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतं. रोज सकाळी रिकाम्या पोटी मेथीचं पाणी प्यायल्यास फायदा होईल.
४) दूध
(Image Credit : www.hellomagazine.com)
कमी फॅट असलेलं किंवा फॅट नसलेल्या दूधात पोटॅशिअम आणि कॅल्शिअम अधिक प्रमाणात असतं. हे दोन्ही पोषक तत्त्व रक्तदाब व्यवस्थित ठेवण्यास मदत करतात. क्रिम असलेलं दूध टाळलं पाहिजे कारण त्यात पाल्मेटिक अॅसिड असतं जे रक्तवाहिन्यांमध्ये अडचण निर्माण करतं. यामुळे रक्तदाब वाढतो.
५) सब्जाच्या बिया आणि पाणी
सब्जाच्या बियांमध्ये ओमेगा -३ हे फॅटी अॅसिड असतं, जे रक्त पातळ करण्यास मदत करतं. आणि रक्तदाब कमी करु शकतं. अर्ध्या तासांसाठी पाण्यात सब्जाच्या बिया भिजवून ठेवा आणि नंतर ते पाणी प्यावे. याचा फायदा करुन घेण्यासाठी एक महिना हे करावं.
(टिप : वरील कोणताही उपाय करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. कारण यातील काही गोष्टींची काहींना अॅलर्जी असण्याचीही शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने हे घ्यावे.)