Ayurvedic medicine : अरे व्वा! कोरोनाच्या उपचारात प्रभावी ठरताहेत 'आयुष 64' आयुर्वेदिक औषध; आयुष मंत्रालयाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 05:44 PM2021-04-29T17:44:43+5:302021-04-29T18:41:46+5:30

Ayush 64 ayurvedic medicine for covid 19 :आयुष ६४ चे परिणाम खूपच उत्साहवर्धक आहे आणि जगातील नामांकित वैद्यकीय जर्नल्समध्ये लवकरच त्याच्या चाचण्यांचे निकाल जाहीर केले जातील.

ayush 64 ayurvedic medicine found useful in mild to moderate covid-19 treatment says ministry of ayush | Ayurvedic medicine : अरे व्वा! कोरोनाच्या उपचारात प्रभावी ठरताहेत 'आयुष 64' आयुर्वेदिक औषध; आयुष मंत्रालयाची माहिती

Ayurvedic medicine : अरे व्वा! कोरोनाच्या उपचारात प्रभावी ठरताहेत 'आयुष 64' आयुर्वेदिक औषध; आयुष मंत्रालयाची माहिती

Next

कोरोना विषाणूच्या संसर्गाविरूद्ध लढा देण्यासाठी एकिकडे सरकार देशभरातील नागरिकांना लस  घेण्याचे आवाहन करत आहे. दरम्यान एक आयुर्वेदिक औषध देखील समोर आले आहे, जे कोरोनाच्या उपचारात प्रभावी ठरत असल्याची चर्चा आहे. आयुष मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आलं आहे की आयुष 64 नावाचे औषध कोरोनाच्या सौम्य आणि मध्यम पातळीवरील  रुग्णांच्या उपचारांसाठी प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं आहे.  आयुष मंत्रालयाने गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आयुष मंत्रालयाने असे म्हटले आहे की, देशात कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीत प्रख्यात संस्थांच्या शास्त्रज्ञांना  या शोधाच्या माध्यमातून आशेचा किरण दिसला आहे.

आयुषचे राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले की, ''आयुष ६४ चे परिणाम खूपच उत्साहवर्धक आहे आणि जगातील नामांकित वैद्यकीय जर्नल्समध्ये लवकरच त्याच्या चाचण्यांचे निकाल जाहीर केले जातील. आयुष 64 हे एक हर्बल औषध आहे आणि आयुर्वेदिक विज्ञानातील केंद्रीय संशोधन मंडळाने त्याचा शोध लावला आहे आणि कोरोना संसर्गाच्या सौम्य आणि मध्यम पातळीवर उपचार करण्यासाठी ते प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.''

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी सांगितले की, ''लेडी हार्डींग मेडिकल कॉलेजमध्ये काही दिवसात ४०० पेक्षा जास्त बेड्स उपलब्ध होतील. इतकंच नाही तर ऑक्सिजन सपोर्ट आणि व्हेंटिलेटरची सुविधा देखिल मिळणार आहे.  मी स्वतः याचे निरिक्षण केले आहे. काही आठवड्याच्या आत हे बेड्स तयार होतील असे आश्वासन मला मिळाले आहे. ऑक्सिजन आधीसुद्धा पुरेश्या प्रमाणात उपलब्ध होता आतादेखील आहे. पण लोकांना ऑक्सिजनबाबत  व्यवस्थित माहिती असायला हवी, ज्याला गरज असेल त्यानंच ऑक्सिजनचा वापर करायला हवा. स्वतःहून रुग्णालयात धाव घेऊ नये.''  बाहेरून कोणीही आल्यास तुमच्या घरातही होऊ शकतो कोरोनाचा शिरकाव; CDC नं दिल्या गाईडलाईन्स

पुढे त्यांनी सांगितले की, ''आपलं सगळ्यात मोठं शस्त्र मास्क हे आहे. तुम्ही काहीही करा पण कोविडच्या नियमांचे पालन करणं विसरू नका. दोन मीटरचं अंतर ठेवा, चाचणी करायला विसरू नका, कोविन प्लॅटफॉर्म सुरू केल्यानंतर ३ तासात ८८ लाखांपेक्षा जास्त लोकांनी लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केले. ज्या वेगानं लोक कोरोनाच्या जाळ्यात अडकत आहेत. त्याचवेगानं बरेसुद्धा होत आहेत. भारताचा मृत्यूदर जवळपास सगळ्यात कमी आहे. '' लक्षणं असतानाही या ५ कारणांमुळे तुमची कोरोनाची टेस्ट येऊ शकते निगेटिव्ह; वेळीच सावध व्हा

Web Title: ayush 64 ayurvedic medicine found useful in mild to moderate covid-19 treatment says ministry of ayush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.