आयुष्मान खुराणाच्या पत्नीला '0 स्टेज' ब्रेस्ट कॅन्सर, जाणून घ्या किती घातक आहे ही स्टेज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 12:25 PM2018-09-25T12:25:57+5:302018-09-25T12:38:52+5:30
आयुष्मानची पत्नी ताहिरा कश्यपला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. ही बाबा ताहिराने स्वत: इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून सांगितली आहे.
अभिनेता इरफान खान आणि अभिनेत्रा सोनाली बेंद्रे यांच्यानंतर आता अभिनेता आयुष्मान खुराणा याच्या पत्नीला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची माहिती समोर आली आहे. आयुष्मानची पत्नी ताहिरा कश्यपला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. ही बाबा ताहिराने स्वत: इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून सांगितली आहे. तिने सांगितले की, होय मला ब्रेस्ट कॅन्सर आहे. पण चांगली बाब ही आहे की, माझा कॅन्सर हा आता झिरो स्टेजवर म्हणजेच फारच सुरुवातीच्या स्टेजवर आहे. ताहिराने हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर करुन कॅन्सरबाबत एका सविस्तर पोस्ट लिहिली आहे.
ताहिराने लिहिले की, 'तुमच्या सपोर्टसाठी आणि प्रार्थनांसाठी खूप आभार. गेले सात दिवस आमच्यासाठी खूपच कठीण दिवस होते. पण आम्ही हे चॅलेंज समजून घेऊन आनंदाने स्विकारलं आणि याच्याशी लढा दिला'. ताहिराला यासाठी सर्जरी करावी लागली. तसेच ताहिराने आपल्या या पोस्टच्या माध्यमातून महिलांना जागृत राहण्याचा सल्ला दिला आहे. तिने सांगितले की, मी ३५ वर्षांची आहे. मला फार लवकर या आजाराबाबत माहिती पडलं. तुम्हीही याबाबत वाचलं पाहिजे आणि नेहमी बॉडी चेकअप केलं पाहिजे.
View this post on Instagram
ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे
www.onlymyhealth.com या हेल्थ वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, ब्रेस्टमध्ये वेदना किंवा जराही गाठ असल्याचं जाणवलं तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. कधी कधी गाठीमध्ये वेदना नसतात, पण त्या जाणवतात. स्तनांमध्ये असलेली गाठ मेमोग्राफीच्या माध्यमातून माहिती केल्या जाऊ शकतात. याने ब्रेस्ट कॅन्सरबाबतही जाणून घेतात येतं. तसेच मेमोग्राफीसाठी फार खर्चही येत नाही. ३० ते ३५ वयाच्या महिलांनी एकदा नक्की मेमोग्राफी करायला हवी. ब्रेस्टमध्ये गाठ येणे, वेळेनुसार ती वाढणे, ब्रेस्ट असामान्य पद्धतीने वाढणे, बगलीमध्ये सूज येणे, निप्पल लाल होणे किंवा त्यातून रक्त येणे, ब्रेस्टमध्ये जास्त वाढ दिसेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ब्रेस्ट कॅन्सरची कारणे
- जर तुम्हाला ब्रेस्टमध्ये कोणत्याही प्रकारची गाठ जाणवत असेल तर वेळीच तपासणी करा. तपासणी केल्यावरच हे माहीत होईल की, गाठ किती घातक आहे.
- ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता ही जास्तीत जास्त वातावरण आणि जीवनशैलीवर निर्भर असते.
- महिलांमध्ये हा आजार फूड अॅलर्जीच्या कारणानेही होऊ शकतो.
- अनुवांशिकतेच्या कारणानेही महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो.
- ब्रेस्ट कॅन्सरने ग्रस्त एका महिलेकडून दुसऱ्या महिलेलाही हा आजार होऊ शकतो.
- गर्भनिरोधक गोळ्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं मुख्य कारण मानलं जातं. एखादी महिला लवकर आई झाली तर त्या महिलेमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते.
ब्रेस्ट कॅन्सरवर उपाय
हे गरजेच आहे की, मासिक पाळीनंतर ३० वयाच्या प्रत्येक महिलेने ब्रेस्ट आणि त्याच्या आजूबाजूला होणाऱ्या बदलांची तपासणी करावी. महिलांनी मेमोग्राफी करायला हवी. मेमोग्राफीच्या माध्यमातून तांदळाच्या दाण्या इतक्या सूक्ष्म कॅन्सरग्रस्त भागाचा शोध घेतला जाऊ शकतो. वेळीच यावर उपाय केला गेल्यास ब्रेस्ट पूर्णपणे काढण्याची गरज पडत नाही. ब्रेस्ट कॅन्सरची अॅडव्हांस स्थिती माहिती पडली तर उपचारासाठी ब्रेस्ट ऑपरेशनच्या माध्यमातून पूर्णपणे काढावा लागतो.