सतत होणाऱ्या पाठदुखीच्या त्रासाकडे करु नका दुर्लक्ष, करा हे उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 02:08 PM2018-06-20T14:08:49+5:302018-06-20T14:08:49+5:30
पाठदुखीचा त्रास होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. चला जाणून घेऊया कारणे आणि त्यावर उपाय...
पाठीचा त्रास होणे ही आज सामान्य बाब झाली असली तर पाठीदुखी सामान्य नाहीये. तुम्हाला सतत पाठदुखीचा त्रास होत असेल आणि त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला हे चांगलंच महागात पडू शकतं. पाठदुखीचा त्रास होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. चला जाणून घेऊया कारणे आणि त्यावर उपाय...
जर पाठीदुखीवर तुम्ही वेळेवर उपचार केले नाहीत तर ही सामान्य पाठदुखी तुम्हाला अधिक त्रास देऊ शकते. जर तुम्ही अनेक महिन्यांपासून याकडे दुर्लक्ष करत असाल तर आता करु नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
काय असू शकतात पाठीदुखीची कारणे?
पाठदुखीचं एक मुख्य कारण पाठीचे मसल्स कमजोर होणे हे असू शकतं. किंवा जन्मापासूनच पाठीमध्ये काही त्रास असणे हेही कारण असू शकतं. त्यासोबतच टीबी आणि कॅन्सरमुळेही ही समस्या होते. पाठीवर अधिक वजन उचलणे, पाठीचा कणा सरकणे, कंबर लचकणे, योग्य प्रकारे न झोपणे इत्यादी पाठदुखीची कारणे असू शकतात.
काय आहे उपाय?
पाठदुखी दूर करण्यासाठी वेगवेगळी योगासने करायला हवीत. पाठदुखी दूर करण्यासाठी धनुषासन आणि पवनमुक्तासन ही आसने करु शकता. जास्त मानसिक ताण करुन घेऊ नका. एखाद्या ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली नियमित व्यायाम करा.
यावेळी घ्या डॉक्टरांचा सल्ला
तज्ज्ञांचं म्हणनं आहे की, जेव्हा पाठदुखी असह्य होते आणि हा त्रास सतत होत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मनाने कोणतही औषध घेऊ नका. असे केल्यास अडचणी आणखी वाढू शकतात. पाठदुखीचा त्रास हा हाडांच्या डॉक्टरांना दाखवल्यास उत्तम.