तोंडातील जिवाणूंमुळे ‘डोकेदुखी’ !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2016 05:12 PM2016-11-06T17:12:34+5:302016-11-06T17:12:34+5:30
बऱ्याचदा आपल्या तोंडाला दुर्गंधी येते. काही विशिष्ट खाद्यपदार्थ खाल्ल्याने तोंडातील जिवाणूंमध्ये वाढ होते म्हणून ही दुर्गंधी येते. अमेरिकेतील एका संस्थेने केलेल्या संशोधनाद्वारे, तोंडातील जिवाणूंमुळे नुसती दुर्गधींच नव्हे तर सातत्याने डोकेदुखीचा त्रास वाढत असल्याचे निष्पन्न झाले आहे...
Next
ब ्याचदा आपल्या तोंडाला दुर्गंधी येते. काही विशिष्ट खाद्यपदार्थ खाल्ल्याने तोंडातील जिवाणूंमध्ये वाढ होते म्हणून ही दुर्गंधी येते. अमेरिकेतील एका संस्थेने केलेल्या संशोधनाद्वारे, तोंडातील जिवाणूंमुळे नुसती दुर्गधींच नव्हे तर सातत्याने डोकेदुखीचा त्रास वाढत असल्याचे निष्पन्न झाले आहे. काही पदार्थामध्ये नायट्रेट असते आणि जिवाणूंचा या नायट्रेटच्या प्रक्रियेत सहभाग असतो. त्यामुळे नायट्रिक आॅक्सॉइड तयार होते. त्यामुळे डोकेदुखीचा त्रास उद्भवतो, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. या नायट्रिक आॅक्सॉइडमुळे रक्तवाहिन्या आणि रक्तपुरवठ्यावर प्रभाव पडतो आणि डोकेदुखीचा त्रास होतो. हिरव्या भाज्यांमध्ये नायट्रेट आढळते.
संशोधनानुसार १७२ जणांच्या तोंडात जिवाणू आढळले. त्याचप्रमाणे एक हजारापेक्षा अधिक व्यक्तींमध्ये नायट्रेटची प्रक्रिया पुढे जाऊन डोकेदुखी होत असल्याचे आढळून आले. डोकेदुखी, उलटी होणे, आवाजाचा त्रास होणे अशी लक्षणे संशोधकांना आढळून आली आहेत. कॅनडात आठ टक्के लोकांमध्ये हा आजार आढळून आला आहे. अभ्यासकांकडून या विषयासंबंधी आणखी संशोधन सुरू आहे. हे संशोधन नुकतेच अमेरिकेतील एका मासिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे.