वाढत्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवतील 'या' गोष्टी, आजच आहारात समावेश करा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 01:12 PM2022-11-15T13:12:02+5:302022-11-15T13:13:25+5:30

हिवाळ्यात खूप भुक लागते, चांगलंचुंगलं खाण्याची इच्छा होते. मात्र यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. वजन नियंत्रणात राहत नाही.

Bad-cholesterol-leads-to-heartattack-or-stroke-change-your-diet-immediately | वाढत्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवतील 'या' गोष्टी, आजच आहारात समावेश करा

वाढत्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवतील 'या' गोष्टी, आजच आहारात समावेश करा

Next

आजकाल आपण अवतीभोवती ऐकत आहोत की अगदी तिशीतही तरुणांना हृदयविकाराचा धक्का येतो अनेकांचा यात मृत्युही झाला आहे. तर जिम करताना सुद्धा स्ट्रोक आल्याने मृत्युच्या केसेस दिसून येत आहेत. हे का होते याचा कधी विचार केलाय का ? बदलती जीवनशैली याला मुख्यत: कारणीभूत आहे. थंडीत तेलकट तुपकट खाल्ल्याने देखील शरीराचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हिवाळ्यात खूप भुक लागते, अनेक चांगलंचुगलं खाण्याची इच्छा होते. मात्र यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. वजन नियंत्रणात राहत नाही. कोलेस्ट्रॉल वाढले तर हार्टअटॅक किंवा स्ट्रोक येऊ शकतो. तर सगळं खाताही यायला हवं आणि शरीरही निरोगी राखायचे असेल तर व्यायाम आणि पोषक आहार घेणे गरजेचे असते. हिवाळ्यात कोणता असा आहार घ्याल ज्याने शरीर निरोगी राहील आणि कोलेस्ट्रॉलही वाढणार नाही बघुया

बदाम 

बदामात एंटीऑक्सीडेंट्स आणि व्हिटॅमिन ई सारखे पोषक त्तव असतात. कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवण्यासाठी रोज बदाम खाणे उपयोगी आहे. रात्री २ ते ४ बदाम भिजवून सकाळी उठल्यावर ते खावे, त्याचे पाणी प्यायले तरी ते सुद्धा फायदेशीर आहे.

कडधान्ये

कडधान्य खाणे खुपच फायदेशीर आहे कारण त्यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. फायबर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करते. जास्त कोलेस्ट्रॉल असेल तर तुम्ही ओट्स खाऊ शकता, स्प्राऊट्सचा डाएटमध्ये समावेश करु शकता.

फळं

फळं हे नेहमीच आरोग्यदायी आहेत. सफरचंद, पिअर म्हणजेच नाशपती, लिंबू  या फळांचा आहारात समावेश करावा. ही फळं हृदयासाठी चांगली असतात. सफरचंदात पेक्टिन आणि पॉली फेनोल्स हे तत्व असतात जे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतात. नाशपतीमध्ये व्हिटॅमिन्स आणि एंटीऑक्सीडेंट्सने मुबलक असतात यांचाही कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर असतात. 

बीन्स 

बीन्समध्ये भरपुर सोल्युबल फायबर असते जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यात महत्वपू्र्ण भुमिका बजावते. हृदयासंबंधित सर्व आजार दूर ठेवायचे असतील तर बीन्सचे सेवन फायदेशीर आहे.

अकरोड

अकरोड मध्ये अनेक औषधी गुण आहेत.हिवाळ्यात अकरोड खाण्याचा सल्ला आई वडील आज्जी आजोबा नेहमी देतात. अकरोडमध्ये व्हिटॅमिन, एंटीऑक्सीडेंट्स आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड्सची अधिक मात्रा असते. हे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते.

Web Title: Bad-cholesterol-leads-to-heartattack-or-stroke-change-your-diet-immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.