गव्हाच्या पिठात 'ही' एक गोष्टी टाकून बनवा चपात्या, बॅड कॉलेस्ट्रोल शरीरातून सहज पडेल बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 04:16 PM2024-04-18T16:16:47+5:302024-04-18T16:39:02+5:30
Bad Cholesterol: आपल्याच काही चुकामुळे शरीरात जर बॅड कॉलेस्ट्रोल वाढलं तर जीवाला धोका होऊ शकतो.
Bad Cholesterol: आजकाल चुकीची लाइफस्टाईल आणि चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे लोकांमध्ये बॅड कॉलेस्ट्रोलचं प्रमाण वाढत आहे. कमी वयातही ही समस्या भेडसावत आहे. हा एकप्रकारचा मेणासारखा पदार्थ असतो जो शरीरात वाढला तर रक्तवाहिन्या ब्लॉक करू शकतो. यामुळे रक्त पुरवठा जर व्यवस्थित झाला नाही तर हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने शिवाय सुस्त लाइफस्टाईलमुळेही कॉलेस्ट्रोल वाढतं.
हाय कॉलेस्ट्रोलला सायलेंट किलर मानलं जातं. कॉलेस्ट्रोल दोन प्रकारचे असतात एक गुड कॉलेस्ट्रोल आणि दुसरं बॅड कॉलेस्ट्रोल. गुड कॉलेस्ट्रोल शरीरासाठी आवश्यक आहे. पण आपल्याच काही चुकामुळे शरीरात जर बॅड कॉलेस्ट्रोल वाढलं तर जीवाला धोका होऊ शकतो. बॅड कॉलेस्ट्रोल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागतं आणि रक्त पुरवठा खंडीत करतं. यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात.
काय आहे उपाय?
हेच वाढलेलं कॉलेस्ट्रोल कमी करण्यासाठी डाएटमध्ये आणि लाइफस्टाईलमध्ये बदल करणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त लोक गव्हाच्या पिठाची चपाती खातात. अशात या गव्हाच्या पिठात जर काळ्या चण्यांचं पीठ टाकून चपाती बनवली आणि त्याचं सेवन केलं तर कॉलेस्ट्रोल कमी करण्यास मदत मिळते. काळ्या चण्यांमध्ये फायबर प्रमाण भरपूर असतं आणि सोबतच अनसॅचुरेटेड फॅट्सही असतं. जे कॉलेस्ट्रोल कमी करण्यास फायदेशीर ठरतं. केवळ कॉलेस्ट्रोल कमी करण्यासाठीच नाही तर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठीही चणे आणि गव्हाच्या पिठापासून तयार चपात्या फायदेशीर ठरतात.
काळे चणे वेट मॅनेजमेंट करण्यास मदत करतात. काळ्या चण्याच्या पिठापासून तयार चपात्या खाल्ल्याने पोट जास्तवेळ भरलेलं राहतं. यामुळे जास्त भूकही लागत नाही आणि फूड इंटेकही कमी होतं. पचन चांगलं ठेवण्यासाठीही काळे चणे फायदेशीर मानले जातात. अशात गव्हाच्या पिठात तुम्ही काळ्या चण्याचं पीठ रोज नाही टाकलं आणि आठवड्यातून 2 ते 3 वेळाही टाकलं तरी चालू शकतं. याने हाय कॉलेस्ट्रोल कमी होईल आणि पचन तंत्रही चांगलं राहतं.