असे काही पदार्थ जे दह्यासोबत खाल तर पडू शकतं महागात, जाणून घ्या त्यांची नावे!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 09:53 AM2023-05-15T09:53:00+5:302023-05-15T09:54:46+5:30
Bad Food Combination With Curd: तसे तर दह्याचे आरोग्याला होणारे फायदे भरपूर आहेत, पण काही असे पदार्थ किंवा फळं आहेत ज्यांचं दह्यासोबत सेवन केलं तर वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. चला जाणून कोणते आहेत ते पदार्थ....
Bad Food Combination With Curd: उन्हाळ्यात शरीर आणि पोट थंड ठेवण्यासाठी लोक नेहमीच थंड पदार्थांच्या शोधात असतात. अशात या दिवसात लोक दह्या भरपूर सेवन करतात. दह्याचं सेवन केल्याने शरीराला कॅल्शिअम मिळतं. सोबतच पोट थंड राहतं. डायजेशनसाठीही दही फायदेशीर ठरतं. तसे तर दह्याचे आरोग्याला होणारे फायदे भरपूर आहेत, पण काही असे पदार्थ किंवा फळं आहेत ज्यांचं दह्यासोबत सेवन केलं तर वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. चला जाणून कोणते आहेत ते पदार्थ....
1) दही आणि मासे
काही लोक मासे खाताना दद्याचं सेवन करतात. तुम्ही असं अजिबात करू नये. मास्यांसोबत दही कधीच खाऊ नये. दही आणि मासे दोन्हीमध्ये प्रोटीन भरपूर असतं. दोन्ही एकत्र खाल्ल्याने अपचन आणि गॅस्ट्रोइंटेस्टायनलची समस्या होऊ शकते. सोबतच मास्यांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड अधिक असतं. अशात दह्यासोबत याचं सेवन केलं तर तुम्हाला त्वचेसंबंधी समस्या होऊ शकते.
2) फ्राइड फूड आणि दही
जर तुम्ही फ्राइड फूड आइटम्ससोबत दही खात असाल तर याने वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तळलेल्या पदार्थांसोबत दह्याचं सेवन टाळावं. हे एक बॅड फूड कॉम्बिनेशन आहे. असं केलं तर तुम्हाला डायजेशनसंबंधी समस्या होऊ शकते. पोटदुखी आणि ब्लोटिंगची समस्या होऊ शकते.
3) दही आणि कांदा
बरेच लोक रायत्यामध्ये दही आणि कांदा खाणं पसंत करतात. पण तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की, कांदा आणि दही बॅड फूड कॉम्बिनेशन आहे. याने तुम्हाला वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. तुम्हाला अॅसिडिटी, उलटी, एग्जिमा आणि सोरायसिसची समस्या होऊ शकते.
4) दूध आणि दही
दूध आणि दही सुद्धा सोबत कधी खाऊ नये. कोणताही दुधाचा पदार्थ दह्यासोबत खाऊ नये. हे दोन्हीही एकप्रकारच्या अॅनिमल प्रोटीनपासून तयार होतात. पण यांचं एकत्र सेवन केलं तर जुलाब, ब्लोटिंग आणि गॅसची समस्या होऊ शकते.
5) दही आणि आंबा
उन्हाळ्यात लोक पोट थंड ठेवण्यासाठी दह्याचं सेवन करतात. सोबतच आंबेही खातात. आंब्याचा रस खातात. पण यासोबत दही खाऊ नये. हे एक बॅड फूड कॉम्बिनेशन आहे. कारण दोघांचेही गुणधर्म विरूद्ध आहे. दही थंड आहे तर आंबा उष्ण आहे.