खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे होऊ शकतो कॅन्सर, तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 10:13 AM2018-10-01T10:13:28+5:302018-10-01T14:04:31+5:30

जर तुम्ही कमी हेल्दी फूड खात असाल किंवा खाण्याबाबत तुम्हाला काही चुकीच्या सवयी असतील. जसे की जंक फूड, न्यूट्रिशस डाएट न घेणे, तर वेळीच सावध व्हा.

Bad food habits can cause cancer says a nutritionist | खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे होऊ शकतो कॅन्सर, तज्ज्ञांचा दावा

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे होऊ शकतो कॅन्सर, तज्ज्ञांचा दावा

Next

(Image Credit : www.nbcnews.com)

जर तुम्ही कमी पौष्टिक आहार घेत नसाल किंवा खाण्याबाबत तुम्हाला काही चुकीच्या सवयी असतील. जसे की जंक फूड, न्यूट्रिशस डाएट न घेणे, तर वेळीच सावध व्हा. कारण या चुकीच्या सवयींमुळे तुम्हाला कॅन्सरचा धोका होऊ शकतो. 

मेक्सिको येथील जनरल हॉस्पिटलमधील क्लिनिकल न्यूट्रिशन विभाग प्रमुख वेनेसा फुक्स यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की, लोकांनी त्यांच्या डाएटमध्ये ग्रीन टी, डाळिंब आणि फ्लॉवर या पॉलिफनॉल भरपूर प्रमाणात आढळणाऱ्या भाज्यांचा समावेश करायला हवा. कारण पौष्टीक आहार न घेतल्याने किंवा खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो. 

त्यांनी सांगितले की, 'हे सिद्ध झालं आहे की, पॉलिफिनॉल तत्वांनी भरपूर असलेल्या काही पदार्थांमध्ये अॅंटीऑक्सिडेंट्स आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात, ज्यामुळे न्यूरोडिजेनेरेशन कमी होतं. वाढत्या वयाची गती कमी होते आणि कॅन्सरपासून बचाव होतो. 
वेनेसा यांच्यानुसार, ज्या पदार्थांमध्ये पॉलिफिनॉलची कमतरता असते, त्यांचा ब्रेस्ट कॅन्सरपासून ते स्कीन, प्रोस्टेट, आतड्या आणि अन्न नलिकेचा कॅन्सरसोबत संबंध जोडला जातो. म्हणजे तुमच्या डाएटमध्ये पॉलिफिनॉल रिच नसेल तर तुम्हाला कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. 

उदाहरणार्थ ग्रीन टी ब्रेस्ट आणि प्रोस्टेट कॅन्सरचाय पेशी वाढण्यापासून रोखते. तर डाळिंब प्रोस्टेट कॅन्सरचाय पेशींचा विकास कमी करतो. 

Web Title: Bad food habits can cause cancer says a nutritionist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.