सावधान! जेवल्यानंतर तुम्हीसुद्धा हीच चूक करत असाल; तर कितीही पौष्टीक खा, होणार नाही फायदा
By Manali.bagul | Published: February 5, 2021 11:42 AM2021-02-05T11:42:01+5:302021-02-05T12:00:58+5:30
Health Tips in Marathi : तुम्हीसुद्धा जेवणानंतर लगेचच पाणी पीत असाल तर वेळीच सावध व्हायला हवं. जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये हे अनेकांना माहीत असतं.
निरोगी राहण्यासाठी खाण्यापिण्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. आजही खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी गंभीर आजारांचे कारण ठरतात. नेहमी फीट आणि निरोगी राहण्यासाठी जेवल्यानंतर लगेचच पाण्याचे सेवन करणं योग्य ठरत नाही. जर तुम्हीसुद्धा जेवणानंतर लगेचच पाणी पीत असाल तर वेळीच सावध व्हायला हवं. जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये हे अनेकांना माहीत असतं. पण प्यायल्यानं काही होत नाही असा गैरसमज ठेवल्यामुळे लोक वारंवार तिच चूक करतात. लगेच पाणी प्यायल्यानं शरीरावर कसा परिणाम होतो याबाबत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
पचनतंत्र व्यवस्थित काम करत नाही
जेवल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्यानं खाल्लेल्या अन्नाचं पचन लगेच होत नाही. अन्न पचवण्यासाठी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अन्न खाल्ल्यानंतर ताबडतोब पाण्याचे सेवन केल्यास वजन वाढू शकते. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, जेवणाच्या दोन तास आधी पाणी प्या. पाणी प्यायल्याने ही जठराग्नि समाप्त होते. ही जठराग्नि जेवण पचल्यानंतर शरीराला मुख्य उर्जा आणि प्राण प्रदान करते. त्यामुळे जेवण केल्यानंतर पाणी प्यायल्याने जेवण पचत नाही, गळून जाते. असे केल्यास मोठ्या प्रमाणात गॅस आणि अॅसिडी निर्माण होतो. आयुर्वेदानुसार सकाळी अधिक पाणी पिणे, जेवल्यानंतर त्वरीत पाणी न पिणे हा उत्तम मार्ग आहे. यामुळे आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.
गॅस अॅसिडीटी
खाल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यानं गॅस, अॅसिडीटीची समस्या उद्भवू शकते. गॅस आणि एसिडीटीच्या समस्येपासून लांब राहण्यासाठी लगेचच पाणी पिऊ नका.
डायबिटीसच्या रूग्णांसाठी धोकादायक
जेवणानंतर ताबडतोब पाण्याचे सेवन करणे मधुमेहाच्या रुग्णांना धोकादायक ठरू शकते. जेवणानंतर ताबडतोब पाणी घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
अल्सर
जेवणानंतर लगेच पाण्याचे पाणी प्यायल्यानं अल्सर होण्याची शक्यता असते. खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिण्यामुळे गॅस आणि आम्लतेची समस्या देखील उद्भवू शकते. आपण जे अन्न खातो ते बेंबीच्या डाव्या बाजूला असलेल्या जठारात जाऊन पचन क्रिया होते. जठराग्नि खाल्यानंतर एक तासांपर्यंत प्रबळ राहते. आयुर्वेदानुसार जठराची अग्नि ही पचन क्रिया करते. तुम्ही लगेचच पाणी प्यायल्याने जेवण पचण्यास खूप अडचणी निर्माण होऊ शकते. त्यामुळे आयुर्वेदने जेवण आणि पाणी पिण्यामध्ये अंतर ठेवण्यास सांगितले आहे.
पाणी पिण्याची योग्य वेळ
सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास पाणी प्या. जेवायच्या अर्धा तास आधी पाणी प्या. त्यामुळे जेवण पचण्यास मदत होईल. जेवल्यानेतर अर्धा तासाने पाणी प्या. व्यायाम करायच्या आधी आणि नंतर भरपूर पाणी प्या. त्यामुळे डिडहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि ताजंतवानं राहण्यासाठी दररोज योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचं आहे.
(टिप : वरील सर्व उपाय आम्ही माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.)