किडनी डॅमेज करू शकतात 'या' सवयी, वेळीच व्हा सावध नाही तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 10:33 AM2024-04-11T10:33:29+5:302024-04-11T10:33:50+5:30
किडनी जर खराब होत असेल तर शरीरात वेगवेगळ्या गंभीर समस्या होऊ शकतात. अशात या समस्या होऊ द्यायच्या नसेल तर किडनीची काळजी घेणं फार महत्वाचं आहे.
आजकाल लोकांना अनेक गंभीर आजार सहजपणे होत आहेत. याचं कारण खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, चुकीची लाइफस्टाईल आणि चुकीच्या सवयी. छोट्या छोट्या चुकीच्या सवयींमुळे अनेक गंभीर समस्या होतात. या सवयी किडनीही डॅमेज करू शकतात. किडनी लाल रक्तपेशी तयार करतात आणि ब्लड ब्लड प्रेशर रेगुलेट करतात. तसेच शरीरातील विषारी पदार्थ लघवीच्या माध्यमातून बाहेर काढतात.
किडनी जर खराब होत असेल तर शरीरात वेगवेगळ्या गंभीर समस्या होऊ शकतात. अशात या समस्या होऊ द्यायच्या नसेल तर किडनीची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. यासाठी काही सवयी तुम्हाला बदलाव्या लागतील. त्याबाबत आज जाणून घेऊ....
सतत बसून राहणे
जराही ब्रेक न घेता सतत बसून राहून काम करत राहिल्याने किडनीची समस्या वाढू शकते. ब्लड प्रेशर आणि ग्लूकोज मेटाबॉलिज्म नॉर्मल ठेवण्यासाठी नियमितपणे फिजिकल अॅक्टिविटी करत राहणं गरजेचं आहे. याने दोन्ही किडनीचं आरोग्य चांगलं राहतं. जर तुम्ही सतत 8 तासांपेक्षा जास्त चेअरवर बसून काम करत असाल तर मधून मधून ब्रेक घेणं फार महत्वाचं आहे.
जास्त मीठ टाळा
किडनीसाठी वाईट असलेल्या सवयींमध्ये मिठाचं जास्त सेवन याचाही समावेश आहे. जास्त मीठ खाल्ल्याने ब्लड प्रेशर वाढतं. ज्यामुळे डॅमेजचा धोका असतो. अशात जेवणातून मिठाचं सेवन कमी करा.
पाणी कमी पिणे
दिवसभर भरपूर पाणी न प्यायल्याने किडनी खराब होण्याचा धोका वाढत असतो. शरीरात पाणी कमी असेल तर लघवीमध्ये समस्या होऊ शकते आणि यामुळे किडनीवर वाईट प्रभाव पडतो. सोबत पाणी कमी करणाऱ्या गोष्टींचं सेवनही कमी करा.
कमी झोप घेणे
रोज चांगली झोप घेणं तुमच्या आरोग्यासाठी आणि किडनीच्या आरोग्यासाठी फार महत्वाचं आहे. झोपेच्या क्वालिटीवरून किडनीचे फंक्शन्स नियंत्रित होतात जे किडनीला 24 तास काम करण्यास मदत करतात. त्यामुळे रोज 7 तास झोप घ्यावी.
लघवी रोखून ठेवणे
बरेच लोक काही कारणांनी लघवी रोखून ठेवतात. जर तुम्हीही जोरात आलेली लघवी रोखून ठेवत असाल आणि लघवी जास्त वेळ ब्लॅडरमध्ये राहत असेल तर याने किडनीवर दबाव पडतो. यामुळे किडनी इन्फेक्शन होऊ शकतं.