Health Tips: तुमच्या या सवयींमुळे मेंदुच्या कार्यक्षमतेवर होतो भयंकर परिणाम, आजच सोडा; अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 04:50 PM2022-03-13T16:50:13+5:302022-03-13T16:55:50+5:30

मेंदू नीट काम करत नसेल तर अनेक अडचणी निर्माण होतात, जाणून घेऊया अशा ४ गोष्टींविषयी ज्यामुळे आपला मेंदू नीट काम करत नाही.

bad habits for your brain which will lead to brain issues | Health Tips: तुमच्या या सवयींमुळे मेंदुच्या कार्यक्षमतेवर होतो भयंकर परिणाम, आजच सोडा; अन्यथा...

Health Tips: तुमच्या या सवयींमुळे मेंदुच्या कार्यक्षमतेवर होतो भयंकर परिणाम, आजच सोडा; अन्यथा...

Next

मेंदू (brain) हा आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मेंदूकडून आपल्या पूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवलं जातं. मेंदूचं कार्य नीट होणं गरजेचं असतं. मेंदूचा योग्य वापर करून अनेक लोक यशस्वी होतात. आपण जितका मेंदू शांत ठेवून त्याला कोणत्या तरी कामात नेहमी गुंतवून ठेवतो तेवढा अधिक चांगला काम (Harmful Habits for brain) करतो.

आपण जे खातो त्यातील आवश्यक पौष्टिक घटकांमुळेच मेंदूला चालना मिळत असते. त्यानेच आपली वाढ होत असते. त्याशिवाय बदलत्या काळासोबत मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठीही प्रयत्न करावे लागतात. मेंदू नीट काम करत नसेल तर अनेक अडचणी निर्माण होतात, जाणून घेऊया अशा ४ गोष्टींविषयी ज्यामुळे आपला मेंदू नीट काम करत नाही.

गोड जास्त खाणं -
भारतीय लोकांना गोड-धोड खाण्याची फार आवड असते. अनेकजण जेवणानंतर गोड पदार्थ खाण्यावर भर देतात. जेवल्यानंतर चालावे, असे सांगितले जाते, मात्र ते अनेकांकडून होत नाही. आपण व्यायाम करू शकत नसाल तर गोड पदार्थ जास्त खाणं वेळीच टाळा. यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो आणि भविष्यात विसरण्याचा त्रास वाढत जातो.

पुरेशी झोप घेणं -
नीट झोप घेणं गरजेचं आहे, आपण फक्त 5 ते 6 तासच झोप घेत असेल तर त्याचा परिणाम आपल्या कार्यक्षमतेवर दिसून येतो. मेंदू नीट काम करण्यासाठी त्याला पुरेशी विश्रांती देणंही गरजेचं आहे.

छोट्या-छोट्या गोष्टींवरून रागावणे -
अनेकजण छोट्या-छोट्या गोष्टींवरून चिडतात-रागावतात, तुम्हाला नकळत अशी सवय लागली असेल तर चिडचिडेपणावर वेळीच नियंत्रण ठेवा. सतत चिडणे-रागावणे यामुळे मेंदूच्या ब्लड सेल्सवर प्रेशर वाढतं. यामुळे नंतर तो व्यक्ती मानसिक आजारी पडू शकतो. यामुळे ब्रेन हॅमरेजचाही त्रास होऊ शकतो. याचा आपल्या विचार करण्याच्या समजून घेण्याच्या शक्तीवर परिणाम होतो.

मेंदूचं कार्य दिवसभर चांगलं राहण्यासाठी आपला आहारही चांगला ठेवण्याची आवश्यकता असते. आपला मेंदू नेहमी एकाग्रतेने काम करण्यासाठी त्याला आवश्यक पोषक घटकही मिळणं गरजेचं आहे. मेंदूच्या आरोग्यासाठी विशेषतं: खसखस, बदाम, ड्रायफ्रुट्स, दूध यांचा समावेश असायला हवा. यामुळे आपला मेंदू अधिक गतीनं काम करू शकतो.

Web Title: bad habits for your brain which will lead to brain issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.