Corornavirus : टक्कल असलेल्या लोकांना कोरोनाचा जास्त धोका, अधिक गंभीर आजारी पडण्याचा रिसर्चमधून दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 09:54 AM2021-05-08T09:54:58+5:302021-05-08T10:01:06+5:30

Coronavirus : एका नव्या रिसर्चमधून दावा करण्यात आला आहे की, टक्कल असलेल्या लोकांना कोरोनाचे शिकार झाल्यावर गंभीरपणे आजारी पडण्याचा खूप जास्त धोका आहे.  

Bald men are up to 2-5 times more likely to suffer severe covid 19 says study/ | Corornavirus : टक्कल असलेल्या लोकांना कोरोनाचा जास्त धोका, अधिक गंभीर आजारी पडण्याचा रिसर्चमधून दावा

Corornavirus : टक्कल असलेल्या लोकांना कोरोनाचा जास्त धोका, अधिक गंभीर आजारी पडण्याचा रिसर्चमधून दावा

googlenewsNext

कोरोना (Coronavirus) महामारीचं थैमान जगभरात दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात तर स्थिती चिंताजनक आहे. कोरोनाबाबत नवनवीन रिसर्च समोर येत आहेत. त्यातून वेगवेगळे दावे केले जात आहेत. एका नव्या रिसर्चमधून दावा करण्यात आला आहे की, टक्कल असलेल्या लोकांना कोरोनाचे शिकार झाल्यावर गंभीरपणे आजारी पडण्याचा खूप जास्त धोका आहे.  

एक्सपर्टनुसार, ज्या पुरूषांमध्ये मेल हार्मोन सेंसिटिविटी लेव्हल २२ पेक्षा जास्त आहे, ते सामान्यांपेक्षा २.५ टक्क्यांनी अधिक गंभीरपणे आजाी पडू शकतात. या रिसर्चमध्ये ६५ लोकांचा समावेश करण्यात आला होता. या लोकांना आनुवांशिक टक्कल पडल्याची समस्या होती. (हे पण वाचा : Coronavirus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका वाढणार, बचावासाठी आतापासून घ्या अशी खबरदारी)

डेलीमेलच्या वृत्तानुसार,  तज्ज्ञांनी या लोकांची आनुवांशिकता आणि डीएनए सॅम्पलिंगही केली होती. यादरम्यान पुरूषांच्या केसगळतीच्या पॅटर्नलाही समजून घेण्यात आलं. याला androgenetic alopecia म्हणतात. यामुळे जगातले ५० टक्के पुरूष जे ५० पेक्षा जास्त वयाचे आहेत ते टक्कल पडण्याचे शिकार आहेत. androgenetic alopecia असलेल्या लोकांमध्ये एंड्रोजन्सचं प्रमाण वाढतं. (हे पण वाचा : Corona Vaccine : अलर्ट! लस घेतल्यानंतर, आधी काय करायचं काय नाही? सरकारनं दिल्या नव्या गाईडलाईन्स)

या नव्या रिसर्चमुळे कोरोना रूग्णांच्या उपाचारात नवे उपाय मिळू शकतात. कोरोनावर शोध करत असलेल्या टीमने सांगितले की, या पॅटर्ननुसार जर उपचार केला गेला, तर शक्यता आहे की, कोरोनाचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो.

पुरूषांमध्ये टक्कल असेल तर याला एंड्रोजन रिसेप्टर कंट्रोल म्हटलं जातं. यानेच माहीत होतं की, एखाद्या व्यक्तीचं शरीर एंड्रोजेन्सबाबत किती सेन्सिटीव्ह आहे. एंड्रोजेन्स TMPRSS2 शी जुळलेला आहे. जो कोरोना व्हायरस संक्रमणात महत्वाची भूमिका निभावतो.
 

Web Title: Bald men are up to 2-5 times more likely to suffer severe covid 19 says study/

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.