वजन घटवण्याचे सर्व उपाय करून कंटाळलात का?; ट्राय करा 'हा' जपानी फॉर्म्युला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 02:03 PM2019-06-11T14:03:56+5:302019-06-11T14:04:13+5:30
वजन कमी करण्यासाठी अनेक लोक पाण्याप्रमाणे पैसे खर्च करतात. पण याचा काहीच फरक पडत नाही. अशातच बाजारात मिळणाऱ्या अनेक प्रोडक्ट्सचा आधार घेण्यात येतो. अनेक घरगुती उपायही केले जातात. पण काही केल्या हे वाढलेलं वजन कमी होत नाही.
वजन कमी करण्यासाठी अनेक लोक पाण्याप्रमाणे पैसे खर्च करतात. पण याचा काहीच फरक पडत नाही. अशातच बाजारात मिळणाऱ्या अनेक प्रोडक्ट्सचा आधार घेण्यात येतो. अनेक घरगुती उपायही केले जातात. पण काही केल्या हे वाढलेलं वजन कमी होत नाही. मग अनेक लोक हार मानतात आणि आपल्या वाढलेल्या वजनाचा स्विकार करतात. परंतु हार मानन्याऐवजी तुम्ही एक अत्यंत सोपा आणि उत्तम जपानी फॉर्म्युल्याचा वापर करून नको असलेल्या लठ्ठपणापासून सुटका मिळवू शकता.
लठ्ठपणा कमी करणयासाठी जपानमधील हा फॉर्म्युला अत्यंत सोपा आहे. यासाठी तुम्ही दिवसाची सुरुवात गरम पाण्याने करावी लागेल. जपानमधील अनेक लोक आपल्या नाश्त्यामध्ये हे डाएट फॉलो करतात. हाच आहे लठ्ठपणा कमी करण्यासाठी असलेला जपानी फॉर्म्युला. जाणून घेऊया हा फॉर्म्युला वजन कमी करण्यासाठी कसा फायदेशीर ठरतो त्याबाबत...
यामुळे वाढत नाही वजन...
केळं आपल्या शरीरातील मेटाबॉलिज्झम सिस्टिम सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतं. एवढचं नाही तर आपली पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठीही मदत करतं. केळ्यामध्ये मुबलक प्रमाणात स्टार्च असतात. ज्यामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्सचे प्रमाण अत्यंत कमी असते. केळ्यामध्ये असलेलं फायबर बद्धकोष्ठ दूर करण्यासाठी मदत करतं.
भूक कमी करण्यासाठी फायदेशीर...
स्टार्च आणि हेल्दी कार्बोहायड्रेट मुबलक प्रमाणात असणारं हे डाएट दिवसभरामध्ये आपल्या शरीरातील लठ्ठपणा कमी करण्यासाठी मदत करतो. सकाळच्या नाश्त्यामध्ये केळ्यासोबत गरम पाण्याचे सेवन केलं तर बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे जास्त भूकही लागत नाही.
कसं कराल याचं सेवन?
सर्वाच आधी सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्या. त्यानंतर अर्ध्या तासानंतर 2 केळी खा. तुम्हाला गरज असेल तर तुम्हाला जेवढी भूक आहे, त्यानुसार केळ्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दाव करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.