रक्ताची कमतरता भरुन काढते हे फुल, 'अशापद्धतीने' करा उपयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 01:32 PM2022-05-30T13:32:47+5:302022-05-30T13:33:11+5:30

जाणून घेऊया अशा आणखी एका गोष्टीबद्दल, ज्याद्वारे शरीरातील रक्ताची कमतरता (Banana Flower benefit) भरून काढता येते.

banana flower is extremely beneficial in anemia | रक्ताची कमतरता भरुन काढते हे फुल, 'अशापद्धतीने' करा उपयोग

रक्ताची कमतरता भरुन काढते हे फुल, 'अशापद्धतीने' करा उपयोग

Next

रक्ताच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक प्रकारचे बदल होऊ लागतात. अशा स्थितीत वेळीच उपचार करून घ्यावेत, अन्यथा नंतर त्रास वाढू शकतो. अॅनिमिया झाल्यास डाळिंब आणि बीटरूट खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, काही लोकांच्या समस्या एवढ्यावरच संपत नाहीत आणि त्यांना औषधांचा आधार घ्यावा लागतो. अशी परिस्थिती टाळण्यासाठी आणखी एक नैसर्गिक उपाय घेऊन आहे, ज्यामुळे रक्ताची कमतरता सहज भरून काढता येईल. जाणून घेऊया अशा आणखी एका गोष्टीबद्दल, ज्याद्वारे शरीरातील रक्ताची कमतरता (Banana Flower benefit) भरून काढता येते.

केळीच्या फुलाचा फायदा होईल -
झीन्यूजने दिलेल्या बातमीनुसार,  केळीच्या फुलामध्ये (केळफूल) अनेक प्रकारचे पोषक तत्व आढळतात. त्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि प्रथिने असतात. त्यामुळे अॅनिमिया, डायबिटीज, इन्फेक्शन कमी करणे आणि जास्त रक्तस्राव आणि पीरियड्स दरम्यान होणाऱ्या वेदनांपासूनही आराम मिळतो.

केळीचे फूल कसे खातात -
केळीच्या फुलाचे योग्य प्रकार सेवन कसे करायचे याचा विचार तुम्ही करत असाल. तुम्ही केळ फुलांचा काढा बनवून पिऊ शकता. याचा फायदा तुम्हाला मिळेल. यासाठी आपल्याला केळ फूल एक ग्लास पाण्यात उकळावे लागेल, टेस्टसाठी तुम्ही त्यात थोडे मीठ टाकू शकता. गरम झाल्यावर गॅसवरून उतरवा. यानंतर, थंड झाल्यावर, आपण काळी मिरी आणि अर्धा चमचा जिरे पूड देखील घालू शकता. आता हे मिश्रण पुन्हा शिजवण्यासाठी गॅसवर ठेवा. शिजवल्यानंतर तुमचा केळफुलाचा काढा तयार होईल. थंड झाल्यावर त्यात दही घालून खाऊ शकता.

केळफुलात अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असतात. केळफुलात प्रामुख्यानं फायबर, प्रथिनं, पोटॅशिअम, कॅल्शियम, तांबं, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम आणि ई जीवनसत्त्वं असतात.

आयुर्वेदात केळाच्या फुलाचा काढा करुन मधुमेह असलेल्यांना पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे इन्शुलिनची पातळी कमी होते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी केळफुलाची भाजी खाण्याचाही सल्ला दिला जातो. केळफुलात असलेल्या पोषक तत्त्वांमुळे आणि त्यातील फायबरमुळे वजन कमी करण्यातही या फुलाची मदत होते. वजन कमी करण्यासाठी केळाच्या फुलाचा उपयोग सूप किंवा कोशिंबीरीत करण्याचा सल्ला दिला जातो.

Web Title: banana flower is extremely beneficial in anemia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.