7 दिवसात फॅटी लिव्हरची समस्या दूर करेल केळीच्या खोडाचा ज्यूस, आतड्याही होतील साफ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 03:41 PM2024-01-19T15:41:49+5:302024-01-19T15:42:22+5:30
Banana Stem Juice Benefits : शरीर आतून स्वच्छ करणंही गरजेचं आहे आणि यासाठी केळीच्या खोडाचा ज्यूस प्यायला हवा. चला जाणून घेऊ याचे फायदे...
Banana Stem Juice Benefits : अनप्रोसेस्ड आणि जंक फूड खाऊन शरीरात विषारी पदार्थ जमा होतात. लठ्ठपणा, फॅटी लिव्हर, यूटीआय, यूरिक अॅसिड, बद्धकोष्ठता इत्यादी कारणांमुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होतात. जंक फूड, फास्ट फूडमध्ये टॉक्सिन असतात जे अनेक अवयव खराब करू शकतात. हे बाहेर काढण्यासाठी केळीचं खोड कामात येतं.
केळी एक सुपरफूड आहे आणि यातून पोटॅशिअम, व्हिटॅमिन बी6 मिळतं. मसल्स वाढवण्यासाठीही केळी फायदेशीर आहे आणि शरीरही याने मजबूत होतं. शरीर आतून स्वच्छ करणंही गरजेचं आहे आणि यासाठी केळीच्या खोडाचा ज्यूस प्यायला हवा. चला जाणून घेऊ याचे फायदे...
आयुर्वेद आणि गट हेल्थ कोच डॉ. डिंपल यानी केळीच्या खोडाचा ज्यूस पिण्याची योग्य वेळ आणि त्याचे फायदे सांगितले आहेत. हा उपाय फॅटी लिव्हरमध्ये केवळ 7 दिवसात आराम मिळवून देऊ शकतो. हे बॉडी डिटॉक्स करणारं आणि वजन कमी करणारं ड्रिंक आहे. ज्यातून कॅल्शियम, व्हिटॅमिन बी6, पोटॅशिअम, आयर्न आणि मॅग्नेशिअम मिळतं.
फॅटी लिव्हर समस्या होईल दूर
जास्त फॅट आणि अनप्रोसेस्ड फूड तुमचं लिव्हर खराब करतं. हळूहळू लिव्हरच्या सेल्समध्ये फॅट जमा होऊ लागतं जे पुढे जाऊन लिव्हर सिरोसिस आणि कॅन्सरचं कारम बनतं. केळीच्या खोडामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट आणि कोलेस्ट्रॉल नष्ट करणाच्याची शक्ती असत. त्यामुळे लिव्हरमधून फॅट दूर होईल.
आतड्यांची स्वच्छता
आतड्यांची स्वच्छता होत नसल्याने अनेक पोटासंबंधी समस्या होत राहतात. डॉ. डिंपल यांच्यानुसार, या ज्यूसमुळे लोअर डायजेस्टिव सिस्टीममधील सगळे ब्लॉकेज दूर होतात. यामुळे तुमचं पचन वाढतं आणि पोटातील चरबीही लगेच कमी होते.
कुणी प्यावा हा हेल्दी ज्यूस
या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन बी6, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि आयर्न आहे. जर कुणाला एनीमिया, हाय कोलेस्ट्रॉल, हाय ब्लड प्रेशरची समस्या असेल तर त्यांनी आवर्जून या ज्यूसचं सेवन करावं. पण किडनीची समस्या असेल तर जरा काळजी घ्यावी.
क्रॉनिक किडनी डिजीजमध्ये काळजी
किडनीचा आजार असल्यावर अशा कोणत्याही फूडचं किंवा ड्रिंकचं सेवन करू नये ज्यात पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम जास्त असतं. त्यामुळे कुणाला जर क्रॉनिक किडनी डिजीज असेल तर हा ज्यूस पिण्याआधी एक्सपर्टचा सल्ला घ्यावा.
पिण्याची वेळ आणि पद्धत
असे ज्यूस सकाळच्या वेळी प्यावे. डॉ. डिंपल यांच्यानुसार यापासून फायदा मिळवण्यासाठी 7 ते 10 दिवस हा ज्यूस रोज सकाळी रिकाम्या पोटी 30 ते 10 मिली प्यावा. केळीच्या खोडाच्या ज्यूसने हळूहळू तुमची समस्या दूर होईल.