सहजपणे करू शकत असाल 'या' गोष्टी तर समजून घ्या तुम्ही पूर्णपणे फिट आहात!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 09:31 AM2023-04-29T09:31:11+5:302023-04-29T09:31:22+5:30

एक्सपर्ट्सनी अशा काही फिजिकल अॅक्टिविटीबाबत सांगितलं आहे ज्याद्वारे तुम्ही हे जाणून घेऊ शकता की, तुम्ही आतून किती फिट आहात. चला जाणून घेऊ त्या अॅक्टिविटीबाबत....

Basic tests that can reveal how healthy you are | सहजपणे करू शकत असाल 'या' गोष्टी तर समजून घ्या तुम्ही पूर्णपणे फिट आहात!

सहजपणे करू शकत असाल 'या' गोष्टी तर समजून घ्या तुम्ही पूर्णपणे फिट आहात!

googlenewsNext

सगळ्यांनाच जास्त आणि निरोगी जीवन जगण्याची इच्छा असते. पण आपण आतून किती फिटी किंवा निरोगी आहोत हे माहीत करून घेणं जरा अवघड असतं. अशात एक्सपर्ट्सनी अशा काही फिजिकल अॅक्टिविटीबाबत सांगितलं आहे ज्याद्वारे तुम्ही हे जाणून घेऊ शकता की, तुम्ही आतून किती फिट आहात. चला जाणून घेऊ त्या अॅक्टिविटीबाबत....

एका पायावर बॅलन्स करणे - हे तुम्हाला फारच बालिश वाटू शकतं, पण जर तुम्ही तुमचं शरीर एका पायावर उभं राहून व्यवस्थित बॅलन्स करू शकत असाल तर हा इशारा आहे की, तुमचा ब्रेन फार हेल्दी आहे. अशात हे बघणं फार गरजेचं असतं की, तुम्ही 60 सेकंदासाठ केवळ एका पायावर उभे राहून शरीराचं वजन उचलू शकता किंवा नाही. जर तुम्ही असं 20 सेकंदासाठीही करू शकत नसाल तर समजा की, तुम्हाला पुढे जाऊन मेंदुसंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ब्रिटीश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसीनमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, एका पायावर उभे राहण्याच्या 10 सेकंदाच्या बॅलन्स टेस्टमध्ये अयशस्वी ठरणाऱ्या वृद्ध वयस्कांना पुढील 10 वर्षात मृत्यूचा धोका अधिक असतो.

चेअर टेस्ट - ही टेस्ट करण्यासाठी एक खुर्ची घ्या. या खुर्चीला हात ठेवण्याची जागा असू नये. खुर्चीवर बसा आणि नंतर हे बघा की, तुम्ही किती वेळा खुर्चीवरून उठून बसू शकता. यूकेमध्ये करण्यात आलेल्या एका स्टडीमधून समोर आलं की, जे वयस्क 20 सेकंद किंवा त्यापेक्षाही कमी वेळात 10 वेळा असं करू शकले त्यांची जास्त आणि निरोगी जीवन जगण्याची शक्यता त्या लोकांपेक्षा जास्त होती जे असं करू शकले नाहीत. हा टास्क करण्यासाठी तुमच्या लोअर बॉडीच्या मसल्स मजबूत असणं गरजेचं असतं.

पायाच्या बोटांना स्पर्श - हे करण्यासाठी जमिनीवर बसा आणि दोन्ही पाय सरळ करा. त्यानंतर हातांनी दोन्ही पायांच्या अंगठ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही असं करू शकत नसाल तर हा इशारा आहे की, तुम्हाला पुढे जाऊन हृदयासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अभ्यासकांनी सांगितलं की, फ्लेक्लिबल बॉडी, फ्लेक्सिबल आर्टरीजकडे इशारा करते. तुमच्या लाइफस्टाईलमुळे तुमच्या आर्टरीज कठोर होतात. त्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. ज्यामुळे हृदयरोगाचा धोका जास्त वाढतो.

किती वेगाने चढता पायऱ्या - गॅलिसियामध्ये यूनिवर्सिटी हॉस्पिटल कोरूनाच्या अभ्यासकांनी केलेल्या एका रिसर्चनुसार, जर तुम्ही न थांबता पायऱ्या सहजपणे चढू शकत असाल तर तुमचा वेळेआधी मृत्यू होण्याचा धोका कमी होतो. अभ्यासकांना आढळलं की, ज्या लोकांना पायऱ्या चढण्यात समस्या होते, त्या लोकांचा मृत्यू वेळेआधी होण्याचा धोका अधिक असतो. सोबतच कॅन्सरचा धोकाही अधिक असतो.

Web Title: Basic tests that can reveal how healthy you are

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.