लिव्हर डॅमेज होण्यापासून बचाव करतात तुळशीची पाने, जाणून घ्या कसं कराल सेवन!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 01:07 PM2024-10-09T13:07:10+5:302024-10-09T13:08:11+5:30

Tulsi for healthy liver : लिव्हरची सूज किंवा सामान्य समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही नॅचरल उपायही करू शकता. असाच उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा उपाय म्हणजे तुळशीची पाने.

Basil home treatment for damage liver | लिव्हर डॅमेज होण्यापासून बचाव करतात तुळशीची पाने, जाणून घ्या कसं कराल सेवन!

लिव्हर डॅमेज होण्यापासून बचाव करतात तुळशीची पाने, जाणून घ्या कसं कराल सेवन!

Tulsi for healthy liver :  आजकाल लिव्हर डॅमेज होण्याच्या अनेक केसेस समोर येत असतात. फॅटी लिव्हरची समस्या ही याची पहिली पायरी असते. त्यानंतर दुर्लक्ष केल्याने आणि अधिक मद्यसेवन केल्याने लिव्हर डॅमेजची स्थिती निर्माण होते. मात्र, लिव्हर हे एक असं अवयव आहे की, ज्याला वेळ दिला तर ते स्वत: रिपेअर होऊ शकतं. लिव्हरची सूज किंवा सामान्य समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही नॅचरल उपायही करू शकता. असाच उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा उपाय म्हणजे तुळशीची पाने.

तुळशीच्या झाडाला आयुर्वेदात फार महत्व आहे. तुळशीचा वापर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी केला जातो. कारण यात अनेक अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स, अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी-वायरल आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. तुळशीचा वापर लिव्हर, हृदय आणि किडनीच्या समस्या दूर करण्यासाठी देखील केला जातो. आयुर्वेदात तुळशीला अदाप्टोजेन म्हटलं जातं. ज्याचा अर्थ होतो याने शरीराला तणावातून दूर होण्यास मदत मिळते आणि इम्यून सिस्टमही मजबूत होतं. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुळशीच्या पानांचे लिव्हरला काय फायदे मिळतात.

तुळशीचा चहा

तुम्ही अनेक घरांमध्ये तुळशीचं झाड पाहिलं असेल आणि चहामध्ये रोज तुळशीची पाने टाकली जातात. सकाळी चहामध्ये काही तुळशीची पाने टाकली तर लिव्हर डिटॉक्स होण्यास मदत मिळते. ५ ते ६ तुळशीची पाने एक कप पाण्यात उकडून चहा तयार करा आणि रिकाम्या पोटी सेवन करा.

तुळशीचा रस

जर तुम्हाला चहा आवडत नसेल किंवा पित नसाल तर तुम्ही तुळशीच्या रसाचं सेवन करू शकता. तुळशीच्या पानांचा ताजा रस काढून १ ते २ चमचे सेवन केल्याने लिव्हरला फायदा मिळतो.

तुळशी आणि मध

तुळशी आणि मधाचं सेवन सोबत केल्याने शरीराला अनेक फायदे मिळततात. सर्दी-खोकला, घशातील खवखव याने दूर होण्यास मदत मिळते. यासाठी आधी तुळशीच्या पानांची पेस्ट तयार करा आणि नंतर त्यात थोडं मध टाका. हे मिश्रण रोज सकाळी सेवन केल्याने लिव्हरची कार्यक्षमता वाढण्यास मदत मिळते.

तुळशीची पाने खा

जर तुम्ही रोज तुळशीची पाने अशीच खाल्ली तरी तुम्हाला फायदा मिळू शकतो. रोज सकाळी रिकाम्या पोटी ५ ते ६ तुळशीची पाने खा, याने लिव्हरची सफाई होण्यास मदत मिळते. फक्त काळजी घ्या की, तुळशीचं तुम्ही अधिक सेवन करू नये. याने लिव्हरची समस्या वाढू शकते.

Web Title: Basil home treatment for damage liver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.