Basil तुळशीचे आरोग्यदायी फायदे माहीत असतीलच, आता जाणून घ्या तोटे; नंतर पडेल महागात....
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 04:40 PM2022-11-16T16:40:50+5:302022-11-16T16:43:05+5:30
लहानपणापासूनच आपण तुळस खाण्याचे फायदेच ऐकले आहेत. खोकला झाला की घरातील वयस्कर लोकांनी नेहमी तुळशीचे पान खायचा सल्ला दिला आहे.
Basil लहानपणापासूनच आपण तुळस खाण्याचे फायदेच ऐकले आहेत. खोकला झाला की घरातील वयस्कर लोकांनी नेहमी तुळशीचे पान खायचा सल्ला दिला आहे. तुळस ही अमृततुल्य औषधी म्हणुन ओळखली जाते. कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तुळस खाल्ली जाते. हे झाले फायदे मात्र तुळस ही शरीरासाठी नुकसानकारक ही ठरु शकते. फायद्यासोबतच एखाद्या गोष्टीचे तोटे माहित असणेही तितकेच गरजेचे आहे. तुळशीमुळे काय नुकसान होऊ शकते बघुया
अतिप्रमाणात खाणे धोकादायक
तुळशीच्या पानात एंटीफर्टिलिटी गुण असतात. यांचे अतिसेवन धोकादायक ठरु शकते. म्हणुन रोज २ ते ३ तुळशीचे पान खाल्ले तरी हरकत नाही, मात्र त्याचे अतिप्रमाणात से२वन होऊ देऊ नका.
दात खराब होण्याची शक्यता
तुळशीच्या पानात मर्करी आणि लोहाचे प्रमाण जास्त असते. तर आर्सेनिकचा ही समावेश असतो. जास्तच चावून चावून हे पान खाल्ले तर दात खराब होऊ शकतात.
रक्त पातळ होऊ शकते
महिलांना मासिक पाळीच्या वेळी तुळस खाणे फायदेशीर असते. कारण तुळशीत blood clot ब्लड क्लॉट थांबवण्याची क्षमता असते. मात्र याच्याच अतिसेवनामुळे रक्त पातळ होण्याचा धोकाही असतो.
गरोदर महिलांनी खावे की नाही
भारतात तुळशीचे महत्व अधिक आहे. त्याकडे औषधाचाच प्रकार म्हणून बघितलं जातं. गरोदर महिलांनी या काळात सर्दी, खाोकला झाल्यास तुळशीचे पान खायला काहीच हरकत नाही. तरी याचे अतिसेवन होऊ देऊ नये. कारण यातील एंटीफर्टिलिटी गुणधर्म जास्त प्रमाणात झाल्यास नुकसानकारक होऊ शकते.
म्हणुनच कशाचेही अतिसेवन शरीरासाठी नुकसानकारकच असते. मग एखादी गोष्ट औषधी का असेना त्याचे अतिप्रमाणात सेवन करु नये. नाहीतर शरीरात त्वरित बदल दिसून येतात आणि घातक परिणामांचाही सामना करावा लागतो.