तुळशीच्या पानांचा 'अशाप्रकारे' केला उपयोग तर ठरेल किडनी स्टोनवर अत्यंत फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 05:42 PM2022-09-18T17:42:05+5:302022-09-18T17:59:36+5:30

किडनी स्टोन दूर करण्यासाठी तुळशीचा रस सर्वात फायदेशीर आहे.

basil leaves or tulsi is extremely beneficial for kidney stone | तुळशीच्या पानांचा 'अशाप्रकारे' केला उपयोग तर ठरेल किडनी स्टोनवर अत्यंत फायदेशीर

तुळशीच्या पानांचा 'अशाप्रकारे' केला उपयोग तर ठरेल किडनी स्टोनवर अत्यंत फायदेशीर

googlenewsNext

जेव्हा किडनीमध्ये मिनरल्स आणि सॉलचा कठीण भाग जमा होऊ लागतो. तेव्हा किडनीमध्ये स्टोनची समस्या उद्भवते. ते अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे पोटात असह्य वेदना होतात. चुकीच्या खाण्याच्या सवयी, वाढते वजन आणि काही वैद्यकीय परिस्थिती याला कारणीभूत आहेत. किडनी स्टोनमुळे मूत्राशयात अनेक प्रकारचे त्रास होतात.

किडनी स्टोनच्या त्रासावर योग्य वेळी उपचार न केल्यास त्याचा परिणाम शरीराच्या इतर अनेक भागांवर होऊ लागतो. किडनी स्टोन काढण्यासाठी अनेक प्रकारचे घरगुती उपाय केले जातात. त्याचे फायदेही आहेत. राजमा, लिंबाचा रस, अप्पल सायडर व्हिनेगर, डाळिंबाचा रस इत्यादींनी यावर मात करता येते. हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, किडनी स्टोन दूर करण्यासाठी तुळशीचा रस सर्वात फायदेशीर आहे.

TataHealth नुसार, वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की तुळशीच्या पानांमध्ये आढळणारी काही संयुगे शरीरातील यूरिक ऍसिडची पातळी स्थिर करू शकतात. युरिक ऍसिडमुळे किडनी स्टोन वाढते. याशिवाय तुळशीच्या पानातील अॅसिटिक अॅसिड स्टोन विरघळण्यास मदत करते.

किडनी स्टोनसाठी असा करा तुळशीच्या पानांचा वापर
- जर तुम्हाला मुतखडा असेल तर तुम्ही दररोज एक चमचा तुळशीच्या पानांचा रस घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या सॅलडमध्ये तुळशीची काही कच्ची पाने देखील टाकू शकता.

- किडनी स्टोन दूर करण्यासाठी रोज तुळशीची पाने मिसळून चहा बनवा. ताजी किंवा वाळलेली तुळशीची पाने वापरून चहा बनवा आणि दररोज प्या.

- तुळशीच्या पानांचा रसदेखील तुम्ही घेऊ शकता. यासाठी तुळशीची ताजी पानं स्वच्छ करून ज्युसरमध्ये टाकून बारीक करून घ्या. त्यानंतर तुम्ही ते स्मूदीप्रमाणे वापरू शकता. मात्र दररोज फक्त एक किंवा दोन चमचे याचे सेवन करा.

तुळशीच्या पानांचे इतर फायदे
आरोग्याशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी तुळशीमध्ये अनेक गुणधर्म आहेत. भारतात शतकानुशतके तुळशीची पूजा केली जाते. पारंपारिकपणे, तुळशीचा उपयोग जखमा, जळजळ, सर्दी, खोकला बरे करण्यासाठी आणि पोटाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जातो. पण त्यामुळे किडनी स्टोनही दूर होऊ शकतो. तुळशीच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटक असतात. त्यामुळे ते किडनीचे आरोग्य राखू शकते. मात्र, इतर भारतीय औषधांप्रमाणे तुळशीवर संशोधन कमी आहे.

Web Title: basil leaves or tulsi is extremely beneficial for kidney stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.