सावधान! हे आहेत तुळशीची पाने खाण्याचे 5 साईड इफेक्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 12:15 PM2018-04-03T12:15:22+5:302018-04-03T12:15:22+5:30
अनेक गोष्टींसाठी फायद्याची ठरणारी तुळशी सर्वांसाठीच फायद्याची नसते. चला जाणून घेऊया तुळशी कुणी खाऊ नये आणि त्याने काय नुकसान होतं.
तुळशीच्या पानांचे आरोग्यदायी फायदे सर्वांनाच माहीत आहेत. आयुर्वेदातही याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. प्रत्येकाच्या घरात एक तुळशीचं रोप असतंच. आणि घरातील वयोवृध्द लोक नेहमीच तुळशीची पाने खाण्याचा सल्ला देतात. पण तुम्हालाही माहीत नसेल की, तुळशीचे काही साईड इफेक्टही आहेत. अनेक गोष्टींसाठी फायद्याची ठरणारी तुळशी सर्वांसाठीच फायद्याची नसते. चला जाणून घेऊया तुळशी कुणी खाऊ नये आणि त्याने काय नुकसान होतं.
1) गर्भवती महिलांना नुकसानदायक
तुळशीची पाने गर्भवती महिलांसोबतच त्यांच्या पोटात वाढत असलेल्या बाळासाठीही नुकसानदायक ठरु शकतात. इतकंच नाहीतर गंभीर परिस्थीतीत गर्भपाताचीही भीती असते. कारण तुळशीमध्ये अॅस्ट्रागॉल असतं. जे गर्भाशयात आकुंचन निर्माण करतं. हे गर्भावस्थेत घातक ठरु शकतं.
2) डायबिटीज रुग्णांनी खाऊ नये तुळशी
अनेक अभ्यासातून खुलासा झाला आहे की, तुळशीची पाने खाल्ल्याने ब्लड शुगरची लेव्हल कमी होते. अशात जर एखादा डायबिटीजचा रुग्ण आधीच औषधं घेत असताना तुळशीची पाने खात असेल तर शरीरातील शुगर लेव्हल प्रमाणापेक्षा जास्त कमी होऊ शकते. हे रुग्णासाठी हानिकारक ठरु शकतं.
3) तुळशीमुळे रक्त होतं पातळ
तुळशीची पाने रक्त पातळ करण्यासाठीही ओळखली जातात. अशात जे रक्त पातळ करण्यासाठी औषधांचा वापर करतात त्यांच्यासाठी तुळशी हा सुध्दा एक चांगला घरगुती पर्याय आहे. पण जे आधीपासूनच रक्त पातळ करण्यासाठी औषधं घेताहेत, त्यांनी तुळशीची पाने खाऊ नये. त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
4) लिव्हरला होऊ शकतं नुकसान
WHO नुसार जे लोक एस्टामिनोफेन सारखी औषधं घेत आहेत. त्यांनी तुळशीची पाने नियमीत खाल्ल्यास नुकसान होऊ शकतं. त्यांच्या लिव्हरवर परिणाम होऊ शकतो. असे असण्याचे कारण म्हणजे दोन्हीही दुखण्यापासून सुटका करणा-या गोष्टी आहेत. अशात दोन्ही गोष्टी एकाचवेळी शरीरात गेल्यास तर त्याचा लिव्हरवर परिणाम होतो.
5) दातांवर डाग
तुम्ही कधीतरी हे नक्की ऐकलं असेल की, तुळशीची पाने कधीही चावून खाऊ नये थेट गीळंकृत करावी. याचं वैज्ञानिक कारण म्हणजे तुळशीच्या पानांमध्ये असलेल्या आयर्नमुळे दातांवर डाग निर्माण होऊ शकतात.