वेळीच व्हा सावधान! कानातून वाहणारं पिवळं पाणी ठरु शकतं बहिरेपणाचं कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 02:52 PM2021-07-14T14:52:51+5:302021-07-14T14:53:40+5:30
कानातून पिवळे पाणी वाहणे हा एक सामान्य समस्या आहे. मात्र, सामान्य असली तरीही याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण वेळीच उपचार न झाल्यास त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. बहिरेपणा ही येऊ शकतो.
कानातून पिवळे पाणी वाहणे हा एक सामान्य समस्या आहे. मात्र, सामान्य असली तरीही याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण वेळीच उपचार न झाल्यास त्याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. बहिरेपणा ही येऊ शकतो. जाणून घ्या लक्षणे आणि उपाय...
कानातून पिवळे पाणी येण्याची कारणे
- प्रामुख्याने बॅक्टेरिया, वायरस आणि फंगल इन्फेक्शन होऊन कानातून पिवळे पाणी येते.
- सर्दी होणे, खोकला, टॉन्सिल्स, सायनस यांमुळे नाक आणि घशातील बैक्टीरिया आणि वायरस हे कानात प्रवेश करून तेथे इन्फेक्शन निर्माण करतात त्यामुळे कानातून पिवळे पाणी येते.
- कानाच्या बाह्य भागात जखम होणे, कानात काडी, पेन्सिल इ. तत्सम वस्तू घालण्याच्या सवयीमुळे कानाच्या पडद्याला इजा होऊन कानातून पिवळे पाणी येते.
- वायू प्रदूषण, अॅलर्जी आदी कारणेही कानातून पिवळे पाणी येण्यास कारणीभूत ठरतात.
कानातून पिवळे पाणी वाहत असल्यास दुर्लक्ष करू नका... - कानातून पिवळे पाणी, पू यासारखे स्त्राव येत असल्यास, कान दुखायला सुरवात झाल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता लागलीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळीचं उपचार न केल्यास हे अनेक गंभीर आजारांना निमंत्रण देते.
- कानाभोवतीचा महत्त्वाचा भाग म्हणजे मेंदू. मेंदूत हे कानातील इन्फेक्शन पसरल्यास मेंदूला सूज येणे, चक्कर येणे, मेंदूज्वर अशा गंभीर विकार उद्भवतात.
- त्यामुळे कानातून पिवळा स्त्राव येत असल्यास त्यावर त्वरित उपचार करणेच योग्य ठरते.
कानातून पिवळे पाणी वाहण्यावर उपचार
- औषधाने कानातील संसर्ग नियंत्रणात आणता येतो.
- जास्तीतजास्त पाणी प्या. यामुळे कानातून पिवळे पाणी येण्याच्या आजारातून काहीसा दिलासा मिळेल.
- तुम्हाला बाहेरील ससंर्गामुळे कानातून पिवळे पाणी येत असल्यास डॉक्टर कान साफ करून देतात.
- हा त्रास जास्त काळासाठी राहिला तर डॉक्टर अँटिबायोटीक्सही देऊ शकतात
- अत्यंत गंभीर परिस्थीतीत कानाची सर्जरीही केली जाऊ शकते.
कशी घ्याल कानाची काळजी?
- सर्दी, खोकला होणे, टॉन्सिल्सच्या तक्रारी टाळण्यासाठी थंडगार पदार्थ खाणे टाळा, थंडगार एसीत बसू नका.
- आंघोळ करताना पाणी कानात जाणार नाही याची काळजी घ्या. यासाठी छोट्याशा पॉलिथिन पिशवीने कान झाकावा.
- आंघोळीनंतर कान कोरड्या फडक्याने पुसा.
- कानात काडी, पेन्सिल यासारख्या वस्तू घालणे टाळा.
- वारंवार कान खाजवणेही टाळा.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कानात कोणतेही औषध घालू नका.
- कानातून पिवळे पाणी, पू यासारखे स्त्राव येत असल्यास, कान दुखायला सुरवात झाल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता लागलीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.