त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी अंड्यांचा असा करा वापर!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 11:52 AM2018-07-18T11:52:23+5:302018-07-18T11:52:40+5:30
सौंदर्यात भर घालणारा महत्वाचा घटक म्हणजे केस. परंतु, अनेकदा हेच केस सौंदर्याच्या आड येतात. बऱ्याचदा चेहऱ्यावर, हातावर, पायांवर असलेले केस काढण्यासाठी आटापिटा केला जातो.
सौंदर्यात भर घालणारा महत्वाचा घटक म्हणजे केस. परंतु, अनेकदा हेच केस सौंदर्याच्या आड येतात. बऱ्याचदा चेहऱ्यावर, हातावर, पायांवर असलेले केस काढण्यासाठी आटापिटा केला जातो. चेहऱ्यावरील नको असलेले केस हटवणं हा तरूण मुली आणि महिलांसमोरील मोठा प्रश्न असतो. त्यासाठी अनेक उपाय केले जातात. मग वॅक्सिंग, थ्रेडिंग तसेच अनेकदा लेझर ट्रिटमेंटसारखे उपाय केले जातात. पण या उपायांव्यतिरिक्त काही घरगुती उपायांनी या समस्येवर तोडगा काढता येऊ शकतो. अंड्याच्या मदतीनेही त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. तसेच अंड्यामुळे चेहऱ्यावरील नको असलेले केसही दूर केले जाऊ शकतात. जाणून घेऊयात काही साधे-सोपे घरगुती उपाय...
1. तुमच्या चेहऱ्यावरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी अंड्याचा पांढरा भाग घेऊन त्यामध्ये थोडं कॉर्नफ्लॉवर पावडर घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. जेव्हा चेहऱ्यावर लावलेला हा मास्क सुकून जाईल त्यावेळी हळूहळू तो चेहऱ्यावरून काढा. असे केल्याने चेहऱ्यावरील नको असलेले केस निघून जातील आणि त्वचा मुलायम होईल.
2. तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठीही अंड्याचा पांढरा भाग तुमच्या चेहऱ्यावर लावा. जेव्हा हा सुकून जाईल त्यावेळी याला थंड पाण्याने धुवून घ्या. असे केल्याने त्वचेमध्ये असलेले एक्स्ट्रा ऑईल दूर होईल. चेहऱ्यावरील सुरकूत्याही दूर होतील.
3. जर ब्लॅकहेड्सची समस्या असेल तर अंड्याचा पांढरा भाग चेहऱ्यावर लावा. हा लेप सुकल्यानंतर ठंड पाण्याने धुवून घ्या. आठवड्यातून दोन वेळा असे केल्यानं ब्लॅकहेड्सची समस्या दूर होईल.
4. अंड्याचा उपयोग स्किन टोनर म्हणूनही करण्यात येतो. त्यामुळे तुमची त्वचा फ्रेश आणि मुलायम होण्यास मदत होते. यासाठी एक अंडे फेटून घ्या. त्यानंतर ते चेङऱ्यावर आणि मानेवर लावा. जेव्हा हे मिश्रण सुकून जाईल त्यावेळी गरम पाण्याने धुवून घ्या. यामुळे त्वचेवर ग्लो येतो.
टिप - प्रत्येक व्यक्तीलाच या टिप्सचा उपयोग होईल असे नाही. बऱ्याचदा अनेकांना अंड्याची अॅलर्जी असते. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांच्या सल्यानेच वरील उपायांचा अवलंब करावा.