BEAUTY : घरगुती उपायांनी घालवा दाताचा पिवळेपणा !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2017 09:09 AM2017-03-18T09:09:28+5:302017-03-18T14:39:28+5:30
दातांच्या पिवळेपणामुळे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य काही अंशी प्रभावित होऊन आपला आत्मविश्वास कमी होतो.
Next
बऱ्याचजणांना तंबाखू, गुटखा, मद्यपान करण्याची सवय असते. यामुळे तर दात पिवळे पडतात शिवाय खूप औषधे घेतल्याने आणि स्वच्छता न राखल्याने दातांवर पिवळे डाग पडतात. शिवाय योग्य माहिती नसल्यामुळे दात स्वच्छ करण्यासाठी विविध प्रकारचे केमिकल्स वापरले जातात. याचा देखील दातांवर वाईट परिणाम होतो. या सर्व कारणांमुळे दातांचा पिवळेपणा ही सध्या फार मोठी समस्या बनली आहे.
दातांच्या पिवळेपणामुळे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य काही अंशी प्रभावित होऊन आपला आत्मविश्वास कमी होतो. आजच्या सदरात आम्ही तुम्हाला दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
* कडुलिंबाची काडी
कडुलिंबाची काडी ही नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल व अँटीसेप्टीक आहे. शिवाय कडुलिंबात दात स्वच्छ करण्याचे व बॅक्टेरिया नष्ट करण्याचे गुण आहेत. त्यामुळेच कडुलिंबाच्या काड्या पूर्वीपासून दात साफ करण्यासाठी वापरल्या जात आहेत. रोज लिंबाच्या काडीने दात साफ केल्याने दातांना कीड लागत नाही.
* स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरीमध्ये आढळणारे मॅलिक अॅसिड दातांना पांढरे व चमकदार बनवते. दातांचा पिवळेपणा घालवून दातांना चमकदार बनवण्याचा स्ट्रॉबेरी हा एकदम चविष्ट उपाय आहे. सर्वप्रथम स्ट्रॉबेरी वाटून घ्या. या पल्पमध्ये थोडा बेकिंग सोडा मिसळा. ब्रश केल्यानंतर हे मिश्रण बोटांनी दातांवर लावा. काही दिवस नियमितपणे हा उपाय केल्यावर दात चमकायला लागतील.
* मीठ
मीठाने दात स्वच्छ करणे हा फार जुना उपाय आहे. मीठात २-३ थेंब मोहरीचे तेल मिसळून दात साफ केल्याने पिवळेपणा दूर होऊन दात चमकायला लागतील.