जर तुम्हालाही असेल ही समस्या तर चुकूनही खाऊ नका बीट, पडू शकतं महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 10:39 AM2023-02-07T10:39:38+5:302023-02-07T10:41:14+5:30

Problem with Beetroot: बीट आपल्या शरीराला व्हिटॅमिन बी, सी फॉस्फोरस, फायबर आणि अॅंटी-ऑक्सिडेंटसारखे पोषक तत्व देतं. याने आपलं शरीर फीट आणि निरोगी राहतं.

Beetroot : Do not eat in the body disease otherwise the problem may increase | जर तुम्हालाही असेल ही समस्या तर चुकूनही खाऊ नका बीट, पडू शकतं महागात

जर तुम्हालाही असेल ही समस्या तर चुकूनही खाऊ नका बीट, पडू शकतं महागात

Next

Problem with Beetroot: तसं तर बीट शरीरासाठी फार फायदेशीर असतं. जर तुम्ही बीटाचं नियमित सेवन केलं तर तुम्हाला रक्ताची कमतरता भासणार नाही. सोबतच शरीरातील रक्तही शुद्ध होतं. बरेच लोक रोज बीटाचं सेवन करतात. पण आज आम्ही तुम्हाला हे सांगणार आहोत की, कोणता आजार असल्यावर तुम्ही बीटाचं सेवन करू नये. ज्यामुळे तुमची समस्या वाढू शकते. बीटाचे शरीराला अनेक फायदे होतात, पण काही केसेसमध्ये याने नुकसानही होतं.

बीट आपल्या शरीराला व्हिटॅमिन बी, सी फॉस्फोरस, फायबर आणि अॅंटी-ऑक्सिडेंटसारखे पोषक तत्व देतं. याने आपलं शरीर फीट आणि निरोगी राहतं. याने अनेक आजारही दूर राहतात. अनेक आजारांसोबत लढण्यासाठी याची मदत होते. बीट आपलं ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशरही कंट्रोल करण्यास मदत करतं. पण काही लोकांना यापासून नुकसानही होऊ शकतं.

लिव्हरवर होतो परिणाम

तसं तर बीट डायजेस्टिव सिस्टीमसाठी सगळ्यात चांगलं मानलं जातं.  पण याचं जास्त सेवन केल्याने लिव्हरवर परिणाम होतो आणि याने तुमच्या लिव्हरची समस्या आणखी वाढू शकते. यात असलेलं आयरन आणि कॉपर सारखे तत्व लिव्हरमध्ये जमा होतात. जे लिव्हरसंबंधी आजाराला जन्म देतात.  कधी कधी आपल्याला समजत नाही की, पुढे जाऊन हा आजार मोठं रूप घेतं.

त्वचा रोगींनी बीट खाऊ नये

ज्या लोकांना त्वचेसंबंधी आजार आहेत त्यांनी बीट खाणं टाळलं पाहिजे. तुमच्या शरीरावर लाल चट्टे असतील किंवा एखादी अॅलर्जी असेल तर बीटाचं सेवन करू नये. खाज आणि ताप असेल तर बीट खाऊ नये.  ज्या लोकांना किडनी स्टोनची समस्या आहे तर त्यांनीही बीट टाळलं पाहिजे. कारण बीटाने किडनीवर परिणाम होतो. बीटामध्ये ऑक्सलेट नावाचा एक पदार्थ असतो ज्यामुळे किडनी स्टोनची समस्या आणखी वाढते. 

Web Title: Beetroot : Do not eat in the body disease otherwise the problem may increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.