पोटावरील चरबीमुळे वाढतो हृदयविकाराचा धोका, जाणून घ्या एक्सपर्टचा सल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 10:55 AM2018-10-04T10:55:48+5:302018-10-04T10:56:03+5:30
जगभरातील आकडेवारी सांगते की, अनेकांच्या मृत्युचं सर्वात मोठं कारण कार्डिओवस्कुलर डिजीज म्हणजेच हृदयरोग आहे.
जगभरातील आकडेवारी सांगते की, अनेकांच्या मृत्युचं सर्वात मोठं कारण कार्डिओवस्कुलर डिजीज म्हणजेच हृदयरोग आहे. एका आकडेवारीनुसार २०१६ मध्ये हृदयरोगामुळे जवळपास १७ कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. १९९० च्या तुलनेत २०१६ मध्ये भारतात हृदयरोगाने मृत्यू होण्याच्या संख्येत ३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ही आकडेवारी सांगते की, आपल्याल हृदयरोगांबाबत किती जागरुक राहण्याची गरज आहे. भारतीय लोकांमध्ये हृदयरोगाचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे पोटावरील चरबी आहे. प्रत्येक १० पैकी ७ भारतीयाला जाडेपणामुळे हृदयरोगांचा धोका असतो. यापासून बचाव करण्यासाठी हेल्दी लाइलस्टाइल फॉलो करणे फार गरजेचे आहे.
काय आहे बेली फॅट?
अनेकदा असं होतं की, एखादा व्यक्ती शरीराने सडपातळ किंवा सामान्य असतो, पण त्याच्या कंबरेच्या आजूबाजूला चरबी अधिक असते. ही चरबी घट्ट परिधान केल्यावर बाहेर दिसू लागते. यालाच बेली फॅट म्हटलं जातं. पोटाच्या आजूबाजूला चरबी वाढल्याने मेटाबॉलिज्म डिसऑर्डर सुरु होतं, खासकरुन कार्डियक आजारांचा धोका वाढतो.
पोटावरील चरबी आणि हृदयरोग
हृदयरोग होण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे पोटावरील वाढलेली चरबी हे एक प्रमुख कारण सांगितलं जातं. तुमच्या पोटावर जितकी जास्त चरबी जमा होईल, हृदय रोगांचा धोका तितका जास्त वाढेल. असे होण्याचे कारण म्हणजे जाडेपणामुळे ट्रायग्लिसरायड्स आणि एलडीएल(बॅड कोलेस्ट्रॉल) चं प्रमाण वाढतं. तसेच ब्लड प्रेशरही वाढतं.
भारतीयांमध्ये पोटावर चरबी जास्त का?
जास्तीत जास्त भारतीयांमध्ये पोटावरील चरबी आणि जाडेपणाचं कारण अनुवांशिकता असतं. त्यामुळे पोटावरील चरबी कमी करण्यासाठी एक्सरसाइज आणि डाएट दोन्हींची मदत घ्यावी लागते. पण भारतीय खाद्य पदार्थांमुळे जाडेपणा कमी करणे सोपे नाहीये. भारतीय पदार्थांमध्ये शुगरचा वापर अधिक होतो. जास्तीत जास्त भारतीय उत्सवांमध्ये गोड पदार्थ अधिक खातात. तसेच भारतीय आहारात रिफाइंड कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ जसे की, बासमती तांदूळ, तळलेले पदार्थ, मेद्याचे पदार्थही अधिक खाल्ले जातात.
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी काय करावे?
एका हेल्थ साईटने दिलेल्या माहितीनुसार, तळलेले पदार्थ खाणे चुकीचे नाहीये पण त्यासाठी वापरलं जाणारं तेल समस्येचं मुळ कारण आहे. या तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅट अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे लोणी, क्रीम, पनीर इत्यादींचा वापर कमी करायला हवा. तसेच स्वस्त व्हेजिटेबल आईलचाही वापर करणे टाळावे, कारण यात हायड्रेजेनेटेड फॅट अधिक असतात.
तुम्ही अशा तेलाचा अधिक वापर केला पाहिजे ज्यात पॉलिअन सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड(PUFA) आणि मोनोअन सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड (MUFA) अधिक प्रमाणात असतात. याच्या वापराने एलडीएलची लेव्हल कमी राहते.
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या सल्ल्यानुसार, जर तुम्ही सॅच्युरेटेड फॅटऐवजी पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडचा प्रयोग कराल तर याने हृदयरोगाची शक्यता ३० टक्क्यांनी कमी होते.