केवळ पोटावरील चरबी कमी करणं शक्य आहे का आणि काय आहे उपाय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 11:45 AM2022-10-25T11:45:00+5:302022-10-25T11:45:24+5:30

Belly Fat : फॅट जास्त असेल तर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पोटावरील चरबीचा अनेकांना सर्वात जास्त त्रास होतो. अलिकडे ही समस्या अधिक बघायला मिळते.

Belly Fat Reduce : Is it possible to reduce only stomach fat | केवळ पोटावरील चरबी कमी करणं शक्य आहे का आणि काय आहे उपाय?

केवळ पोटावरील चरबी कमी करणं शक्य आहे का आणि काय आहे उपाय?

googlenewsNext

Belly Fat : शरीरात फॅट म्हणजेच चरबी जमा होणं प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळं असतं. प्रत्येकाचा लठ्ठपणा वेगवेगळा असतो. कुणाला पोटावरील चरबीचा लठ्ठपणा असतो तर कुणाच्या संपूर्ण शरीरात फॅट आणि लठ्ठपणा असतो. योग्य शरीरासाठी आणि आरोग्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात फॅट असणं गरजेचं आहे. पण फॅट जास्त असेल तर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पोटावरील चरबीचा अनेकांना सर्वात जास्त त्रास होतो. अलिकडे ही समस्या अधिक बघायला मिळते.

द हेल्थ साइट डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, जे लोक पोटावरील चरबीमुळे हैराण आहेत, ते वजन कमी करण्याचा विचार करतात. पण त्यांना हा प्रश्न पडतो की, काय केवळ पोटावरील चरबी कमी करणं शक्य आहे? हा असा प्रश्न आहे ज्याचं योग्य उत्तर आतापर्यंत मिळालं नाही. पण याबाबत काही रिसर्च करण्यात आलेत. जर तुम्हीही पूर्ण शरीराचं वजन कमी करण्यापेक्षा केवळ पोटावरील कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर हे शक्य आहे का? हे जाणून घेऊ.

केवळ पोटावरील चरबी कमी करता येते?

जेव्हा आपण वजन कमी करण्यासाठी एखादा एरिया सिलेक्ट करतो तेव्हा त्याला स्पॉट रिडक्शन असं म्हटलं जातं. अनेक रिसर्चमधून हे सांगण्यात आलं आहे की, कधी कधी स्पॉट रिडक्शन वेट लॉस प्लॅन यशस्वी होत नाही.

जर्नल ऑफ स्ट्रेंथ कंडीशनिंग रिसर्चमध्ये प्रकाशित एका शोधानुसार, ६ आठवडे ऍब्स वर्कआउट सुद्धा व्यक्तीच्या पोटावरील चरबी कमी करू शकत नाही. एका दुसऱ्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, १२ आठवडे हाताचे वर्कआउट करूनही हातावरील चरबी कमी झाली नाही. तर हातावरील चरबी सैल होती ती टाइट झाली होती. या दोन्ही रिसर्चमधून हे समोर येतं की, अनेक केसेसमध्ये वर्कआउट किंवा एक्सरसाइज सुद्धा वजन कमी करण्यास फायदेशीर ठरत नाही. खासकरून पोटावरील चरबी करण्याबाबत असं होतं.

तज्ज्ञ सांगतात की, जर तुम्हाला पोटावरील चरबी कमी करायची असेल तर आधी शरीराचा मेटाबॉलिक रेट योग्य करा. चांगल्या मेटाबॉलिक रेटसाठी नियमित एक्सरसाइज करणे सर्वात चांगलं मानलं जातं. एक्सपर्ट सांगतात की, बेली फॅट म्हणजेच पोटवरील चरबी कमी करण्यासाठी मेटाबॉलिक रेट योग्य ठेवणं गरजेचं असतं. 

नेमकं काय होतं?

मेटाबॉलिक रेटमुळे पोटावरील चरबी कमी कशी होते हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती एक्सरसाइज करते तेव्हा शरीरात एक हार्मोन रिलीज होतं. हा हार्मोन मेटाबॉलिक रेटचा वेग वाढवतो आणि याने शरीरात जमा चरबी कमी होऊ लागते. पोट, हात आणि छातीवरील चरबी मेटाबॉलिक रेट वाढल्याने कमी होऊ शकते. 

पोट आत घेण्यासाठी एक्सरसाइज

अनेक रिसर्च सांगतात की, एरोबिक, रनिंग करणे, स्वीमिंग करणे, सायकलिंग या एक्सरसाइज संपूर्ण शरीर फिट ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी सर्वात चांगल्या एक्सरसाइज मानल्या जातात. त्यासोबतच या एक्सरसाइजच्या मदतीने पोटावरील चरबीही कमी करण्यास मदत मिळते.

Web Title: Belly Fat Reduce : Is it possible to reduce only stomach fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.