‘बेलपत्र’ आहे गुणकारी !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2017 11:45 AM2017-03-19T11:45:34+5:302017-03-19T17:27:03+5:30

पूजेसाठी वापरले जाणारे बेलपत्र अनेक प्रकारच्या आजारांवर उपयुक्त असून त्याच्यात असंख्य औषधी गुणधर्म आहेत.

'Belpat' is a good quality! | ‘बेलपत्र’ आहे गुणकारी !

‘बेलपत्र’ आहे गुणकारी !

googlenewsNext
जेसाठी वापरले जाणारे बेलपत्र अनेक प्रकारच्या आजारांवर उपयुक्त असून त्याच्यात असंख्य औषधी गुणधर्म आहेत. 

बेलपत्राचे औषधी गुणधर्म : 
बेलपत्र सेवनाने शरीरात पोषणमूल्यांचे ग्रहण अधिक चांगले होते. यामुळे तुमचे मन एकाग्र होऊन लक्ष केंद्रित व्हायला मदत होते. शिवाय बेलपत्र सेवनाने शारीरिक वृद्धी होते. बेलपत्राचा काढा पिल्याने हृदय मजबूत होते. डोळे आले असतील तर बेलपत्राचा रस डोळ्यात टाकल्याने आराम मिळतो.
दहा ग्रॅम बेलपत्राचा रस एक ग्रॅम काळी मिरी व एक ग्रॅम सेंधव मीठ एकत्र करून दिवसातून तीन वेळा घेतल्याने बद्धकोष्ठतेत आराम मिळतो. बेलपत्र, धने व सोप समप्रमाणात एकत्र वाटून चूर्ण बनवा. रात्री १०० ग्रॅम पाण्यात १० ग्रॅम चूर्ण मिसळून ठेवा. सकाळी हे पाणी पिल्याने शरीरातील अतिरिक्त उष्णता निघून जाईल.

 

Web Title: 'Belpat' is a good quality!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.