बदाम दुधाचे असेही फायदे जे वाचून व्हाल चकित, 'या' रुग्णांसाठी रामबाण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 07:33 PM2021-06-16T19:33:45+5:302021-06-16T19:34:28+5:30
तुम्ही बदामाचे दूध तयार करून त्याचे सेवन करू शकता. जर तुम्ही नियमित बदाम किंवा बदामाचे दूध घेतले तर ते तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.
बदाम हा असा सुका मेवा आहे ज्यातील फॅट सर्वात कमी असते. बदामामध्ये प्रथिने अधिक असतात त्याच्या सेवनाने समरणशक्ती वाढते. बदामाच्या दुधाचा फायदा डोळ्यांनाही होतो. त्यामुळे बदामाचे सेवन आपल्या रोजच्या आहारात घेणे महत्वाचे आहे. तुम्ही बदामाचे दूध तयार करून त्याचे सेवन करू शकता. जर तुम्ही नियमित बदाम किंवा बदामाचे दूध घेतले तर ते तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल, कारण बदामामध्ये कॅल्शियम, मॅगनेशियम, मॅंगेनिज, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई हे घटक असून ते आपल्या शरीरासाठी उपयुक्त मानले जातात. डाएट एक्सपर्ट डॉ रंजना सिंह यांनी झी न्युजला सांगितल्यानुसार बदाम दूध पिण्याचे फायदे काय आहेत ते पाहा?
बदामाचे दुध तयार करण्याची पद्धत
बदाम आठ ते दहा तास अथवा रात्रभर भिजत ठेवा. सकाळी त्याचे साल काढून सोलून घ्या. सोललेले बदाम स्वच्छ धुवून घ्या. ब्लेंडर अथवा मिक्सरमध्ये बदाम आणि त्याच्या चार पट पाणी घालून एक छान स्मूदी तयार करा. एका गाळणीच्या साहाय्याने हे दूध गाळून घ्या आणि वापरा.
मधुमेह असणाऱ्यांनी करा बदामाच्या दुधाचे सेवन
जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास होत असेल तर तुम्ही रोजच्या दुधापेक्षा बदामाच्या दुधाचे सेवन करा. बदामाच्या दुधात साखरेचं प्रमाण कमी असते आणि फायबर अधिक असते.
व्हिटॅमिन डीनं समृद्ध
आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी ची सर्वात जास्त गरज असतेआणि सूर्यप्रकाश हा त्याचा सर्वात मोठा स्रोत आहे. याने आपल्या हृदयाचे कार्य, हाडांची मजबुती आणि रोग प्रतिकार वाढते. प्रत्येकाने रोज एक कप बदामाचे दूध घेतल्यास व्हिटॅमिन डीची कमतरता भासणार नाही.
वजन कमी करण्यास होते मदत
काही तज्ज्ञांच्या मते बदामाच्या दुधामध्ये कमी कॅलरीज असतात बदामाच्या दुधात ८० टक्के कमी कॅलरीज असतात. त्यामुळे आपल्या शरीरात फॅट्स तयार होत नाही. त्यामुळे वजन नियंत्रित राहते. फॅट्सयुक्त पदार्थ खाणाऱ्यांसाठी बदामाचे दूध उत्तम आहे.
व्हिटॅमिन ई ने समृद्ध
दररोज सकाळी आपल्या ब्रेकफास्टमध्ये बदामाच्या दुधाचे सेवन करा. त्यामुळे आपल्या शरीराला व्हिटॅमिन ई मिळते. आपले शरीर दररोज २० ते ५० टक्के व्हिटॅमिन इ खर्च करते. बदामाचे दुध उत्कृष्ट अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करते आणि यामुळे तणाव,जळजळ इत्यादींपासून मुक्ती देते.
कॅल्शियमने परिपूर्ण बदामाचे दूध
जर आपण दररोज एक कप बदाम दूध घेतले तर ते आपल्या शरीराला लागणारं २० ते ४५ टक्के कॅल्शियम दिवसाला पुरवते. तसेच यामुळे आपले हृदय, हाडे, मज्जातंतू हे चांगल्या प्रकारे कार्य करण्यास मदत करतात.