कचरा समजून फेकू नका लिंबाची साल, 'या' ४ प्रकारे करू शकता त्यांचा वापर!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 10:33 AM2024-11-27T10:33:11+5:302024-11-27T10:34:50+5:30
Kitchen Hacks: लिंबाची ताजी साल किंवा वाळवलेल्या सालीचाही तुम्ही अनेक दृष्टीने वापर करू शकता. लिंबाच्या सालीचे काय फायदे होतात आणि याचा वापर तुम्ही कशा कशा पद्धतीने करू शकता हे जाणून घेऊ.
Kitchen Hacks: व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असलेल्या लिंबाचे आरोग्य आणि त्वचेला अनेक फायदे मिळतात. लिंबाच्या रसाचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. भरपूर लोक रोज लिंबू पाणी सुद्धा पितात. मात्र, जास्तीत जास्त लोक लिंबाची साल कचरा समजून फेकून देतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, या सालीपासून एक नाही तर अनेक फायदे मिळतात. लिंबाची ताजी साल किंवा वाळवलेल्या सालीचाही तुम्ही अनेक दृष्टीने वापर करू शकता. लिंबाच्या सालीचे काय फायदे होतात आणि याचा वापर तुम्ही कशा कशा पद्धतीने करू शकता हे जाणून घेऊ.
लिंबाच्या सालीचे फायदे आणि वापर
लिंबाच्या सालीचा चहा
लिंबाच्या सालीचा चहा बनवून पिऊ शकता. लिंबाची साल पाण्यात उकडून त्यात टेस्टनुसार मध टाकून सेवन करू शकता. या चहाने पचनक्रिया चांगली होते, इन्फ्लेमेशन कमी होतं आणि इम्यूनिटीही बूस्ट होते. तसेच घशात वेदना, खोकला, सर्दी अशा समस्याही या चहाने दूर होतात.
नॅचरल क्लेंजर
लिंबाच्या सालीमध्ये असलेल्या हाय सिट्रिक तत्व, अॅंटी-बॅक्टेरिअल गुण आणि अॅंटी-सेप्टिक तत्व यांपासून तुम्ही एक चांगलं क्लीनिंग एजेंट बनवू शकता. या नॅचरल क्लेंजरचा वापर तुम्ही सिंक, भांडी आणि प्लास्टिकच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी करू शकता. क्लेंजर तयार करण्यासाठी व्हाईट व्हिनेगरमध्ये लिंबाची साल टाकून काही वेळ ठेवा. या मिश्रणाचा वापर नॅचरल क्लेंजर म्हणून करू शकता.
फेस पॅक
लिंबाची साल वाळवून नंतर त्याचं पावडर तयार करा. या पावडरचा वापर फेस पॅक बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. लिंबाच्या सालीच्या पावडरमध्ये मध, गुलाबजल किंवा दूध टाकून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे लावून ठेवा नंतर चेहरा धुवून घ्या. या फेस पॅकने चेहरा फ्रेश दिसतो. तसेच चेहऱ्यावरील डागही दूर होण्यास मदत मिळते.
रूम फ्रेशनर
लिंबाच्या सालीचा सुगंध आणि अरोमा यामुळे लिंबाच्या सालीचा वापर रूम फ्रेशनर म्हणूनही करू शकता. अशात तुम्ही लिंबाची साल घरात छोट्या भांड्यामध्ये किंवा पॉटमध्ये टाकून ठेवू शकता. याने घरात सुगंध पसरेल.