हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या योग्य वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 10:08 AM2024-10-29T10:08:29+5:302024-10-29T10:09:16+5:30

Drink Hot Water In Winter: गरम पाणी पिण्याचे काही नुकसानही आहेत. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे, नुकसान आणि पाणी पिण्याची योग्य वेळ याबाबत सांगणार आहोत.

Benefits and disadvantages of drinking hot water in winter | हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या योग्य वेळ!

हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या योग्य वेळ!

Drink Hot Water In Winter: हिवाळ्यात गरम पाणी पिणं आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला जास्त उष्णतेची आणि एनर्जीची गरज असते. अशात गरम पाण्याने शरीर तर हायड्रेट राहतंच, सोबतच अनेक आरोग्यदायी फायदेही मिळतात. मात्र, गरम पाणी पिण्याचे काही नुकसानही आहेत. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे, नुकसान आणि पाणी पिण्याची योग्य वेळ याबाबत सांगणार आहोत.

गरम पाणी पिण्याचे फायदे

१) पचन तंत्र मजबूत होतं

गरम पाणी प्यायल्याने पचन तंत्राला योग्यपणे काम करण्यास मदत मिळते. याने पोटातील अन्न वेगाने पचण्यास मदत होते आणि पचनासाठी आवश्यक एझांइम्सही रिलीज होण्यास मदत मिळते. हिवाळ्यात आपलं मेटाबॉलिज्म स्लो होतं, अशात गरम पाणी पचन योग्यपणे होण्यास फायदेशीर ठरतं.

२) वजन कमी होतं

गरम पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. गरम पाण्याने शरीराचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि फॅट बर्न होण्याची प्रोसेस वेगाने होते. त्याशिवाय गरम पाण्याने भूकही कंट्रोल होतो. ज्यामुळे तुम्ही जास्त खाण्यापासून वाचता.

३) रोगप्रतिकारक शक्ती वाढते

हिवाळ्यात थंडीमुळे सर्दी-खोकला आणि इतर आजारांचा अधिक धोका असतो. कारण या दिवसात आपली रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होत असते. अशात गरम पाणी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच शरीरातील विषारी पदार्थ सुद्धा बाहेर पडतात.

४) बॉडी डिटॉक्स

गरम पाणी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढतात. गरम पाण्याने घाम आणि लघवीच्या माध्यमातून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत मिळते. 

५) डोकेदुखी आणि तणाव कमी होतो

गरम पाणी प्यायल्याने शरीराच्या मांसपेशींना आराम मिळतो आणि याने डोकेदुखी, तणाव आणि इतर शारीरिक वेदना कमी करण्यास मदत मिळते.

हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे नुकसान

१) फार जास्त गरम पाणी घातक

जर पाण्याचं तापमान जास्त असेल तर याने तोंडात, घशात आणि पचन तंत्रातील नाजूक कोशिकांचं नुकसान होतं. जास्त गरम पाणी प्यायल्याने जळजळ, सूज, फोड होण्याची धोका असतो.

२) अवयवांचं नुकसान

जास्त काळ जास्त गरम पाणी प्यायल्याने अंतर्गत अवयवांचं नुकसान होतं. खासकरून हे अशा लोकांसाठी जास्त नुकसानकारक ठरतं, ज्यांना आधीच एखादी गॅस्ट्रिक समस्या आहे.

३) शरीराचं तापमान असंतुलित होणं

जास्त गरम पाणी प्यायल्याने शरीराचं तापमान असंतुलित होऊ शकतं. ज्यामुळे थकवा, चक्कर येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. 

४) कमी तहान लागणे

जर तुम्ही सतत गरम पाणी पित असाल तर याने शरीराला तहान कमी जाणवते. यामुळे शरीराची हायड्रेशन लेव्हल बिघडू शकते.

कधी प्यावं गरम पाणी?

सकाळी रिकाम्या पोटी

सकाळी झोपेतून उठल्यावर रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी पिणं फायदेशीर ठरतं. याने शरीर डिटॉक्स होण्यास आणि मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत मिळते.

जेवणाआधी आणि नंतर

जेवणाच्या जवळपास ३० मिनिटे आधी आणि जेवण झाल्यावर ३० मिनिटांनंतर कोमट पाणी प्यायल्याने पचन तंत्र मजबूत होतं आणि पोटातील वेदना कमी करण्यास मदत मिळते.

शरीराच्या गरजेनुसार

दिवसभरातून साधारण २ ते ३ वेळा कोमट पाणी पिणं फायदेशीर ठरतं. पण याचं सेवन व्यक्तीची शारीरिक स्थिती आणि आरोग्य यावर अवलंबून असतं.

Web Title: Benefits and disadvantages of drinking hot water in winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.